Mhada Konkan Mandal Lottery: म्हाडाच्या घरांकडे का पाठ फिरवत आहेत नागरिक? काय कारणे आहेत यामागे? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Konkan Mandal Lottery:- प्रत्येकाची स्वतःचे घर असावे ही इच्छा असते आणि त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये जर स्वतःचे घर असणे हे तर बऱ्याच जणांचे स्वप्न असते. परंतु आपण जर मोठ्या शहरातील घरांच्या किंवा जागेचा किमतींचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून किमती गगनाला पोहोचल्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा शहरांमध्ये घर विकत घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही.

परंतु अशा ठिकाणी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण मंडळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात येते. या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज तसेच स्विकृती आणि नंतर सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड करून नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.

याचा अनुषंगाने जर आपण म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या ठाणे जिल्हा आणि शहर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणाचा विचार केला तर 5311 फ्लॅट अर्थात सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठीचे अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. परंतु या सगळ्या प्रक्रिया दरम्यान या सोडतीसाठी लोकांचा खूप कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या दिसून येत आहे. नेमका लोकांचा अल्प प्रतिसाद असण्यामागे काय कारणे आहेत? हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला मिळत आहे अल्प प्रतिसाद

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून  पालघर, रायगड तसेच सिंधुदुर्ग, ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी तब्बल 5311 सदनिकांच्या विक्री करता 15 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी विविध गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 5311 घरे तयार करण्यात आलेली असून या घरांसाठीची सोडत ही 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व या ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या मुख्यालयामध्ये करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी यासाठीची ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हाडाच्या माध्यमातून विकली जाणारी ही घरे बिल्डरांच्या घराच्या तुलनेमध्ये खूप कमी दरात मिळण्याची शक्यता आहे. परंतु तरीदेखील यावर्षी काढण्यात आलेल्या लॉटरींना कमी प्रतिसाद मिळत आहे. 15 सप्टेंबर पासून याकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.परंतु सात ते आठ दिवस झाले तरी या कालावधी फक्त 2500 अर्जदारांनीच अर्ज केले असून यामध्ये देखील फक्त ९०४ अर्जदारांनी आवश्यक अनामत रक्कम भरली आहे.

नेमके हे का घडत आहे यामागील कारणांचा शोध घेतला तर या सोडती करिता ऑनलाइन अर्जाची नोंदणी व अर्ज भरण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दल लोकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समजा एका नावाने जर अर्ज भरत असाल तर पॅन नंबर व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवले जात असून जर तुम्ही युजरनेम दुसरे वापरले तर बँक अकाउंट व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे.

जर तुम्ही अर्ज भरताना संगणकावर दोन किंवा तीन युजरनेम टाकले तरी देखील अर्ज भरण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशा अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे देखील अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्या तुलनेत जर मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज भरत असाल तर यामध्ये काहीसा वेग असल्याचे दिसून येत आहे.

 कशी असणार आहे यासाठीची प्रक्रिया?

नागरिकांना म्हाडा कोकण मंडळाच्या सोडती करिता 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज भरता येणार आहेत व त्यानंतर 18 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्जदार यासाठीचे अनामत रक्कम ऑनलाईन भरू शकणार आहेत.

त्यानंतर  अर्ज करणाऱ्यांमध्ये ज्या अर्जदारांची कागदपत्रे व्यवस्थित असतील म्हणजे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार याकरिता पात्र ठरवले जाणार आहेत व अशा पात्र अर्जदारांची अंतिम यादी 3 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर  देखील केली जाणार आहे. त्यानंतर सात नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जे काही पात्र अर्ज असतील त्यांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे.