New Pay Commission: नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्तावाढ आणि नवीन वेतन आयोगाची भेट? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Pay Commission:- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांना जो काही अगोदर 42% इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता या चार टक्के वाढीसह 46% इतका झालेला आहे.

तसेच एक जुलै 2023 पासून ही चार टक्क्यांची वाढ कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यासोबत आता कर्मचाऱ्यांना येणाऱ्या वर्षात जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता वाढ होईल अशा अपेक्षा असून ती किती होईल याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या उद्दिष्टाने कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला जाईल व त्यासोबतच आठवा वेतन आयोग देखील स्थापन केला जाईल या पद्धतीची अपेक्षा आहे. नेमकी याच बाबतची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 जानेवारी 2024 मध्ये पाच टक्के वाढणार महागाई भत्ता

येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पाच टक्के महागाई भत्ता आणि नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार असून जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

या पार्श्वभूमीवर एआयसीपीआय म्हणजेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या बाबत आकडेवारी देखील जाहीर करण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे.

त्यासोबत जानेवारी 2024 मध्ये परत त्यात पाच टक्क्यांची वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे. जर आपण ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक अर्थात एआयसीपीआय निर्देशांकाचा विचार केला तर तो जुलै 2023 मध्ये 139.7 इतका होता तर ऑगस्ट 2023 मध्ये 139.2 अंकांवर पोहोचला.

तसेच सप्टेंबर 2023 मध्ये ही आकडेवारी कमी झाली होती 137.5 अंकांवर स्थिर झाली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्देशांकात परत 0.90 अंकाची वाढ झाली.

सध्या एआयसीपीआय निर्देशांक 138.4 पर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर मात्र अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी यायची बाकी आहे. ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 49.08% वाढ अपेक्षित आहे. जर आपण नंतरच्या दोन महिन्याच्या आकडेवारीचा विचार केला तर महागाई भत्ता हा 50.60% म्हणजेच 51 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे.

 नवीन वेतन आयोगाची स्थापना होणार का?

जर आपण येणाऱ्या वर्षाचा विचार केला तर या नवीन वर्षामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. साधारणपणे 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे

अपेक्षित असल्यामुळे यासाठी येणारा खर्च तसेच वेतनरचना या संदर्भातील आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याकरिता नवीन वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणारा असल्याचे देखील माहिती सध्या समोर येत आहे.