Organic Jaggery: ‘हा’ तरुण शेतकरी सेंद्रिय गुळाच्या निर्मितीतून कमावत आहे लाखो रुपये! वर्षात 8 ते 9 लाखांचे उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Organic Jaggery:- सध्या अनेक तरुण नोकरी नसल्यामुळे व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व बरेच तरुण आता शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर नशीब आजमावत आहेत. शेतीच्या संबंधित असलेल्या प्रक्रिया उद्योग किंवा इतर उद्योगांचा विचार केला तर भली मोठी यादी तयार होईल.

परंतु यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास आणि तुम्ही जो व्यवसाय कराल त्यातील उत्पादन याला बाजारपेठेत किती मागणी आहे याचा विचार करून व्यवसायाची उभारणी करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता जर आपण सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादनाचा विचार केला तर कोरोना कालावधीनंतर सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते.

तसे पाहिले गेले तर आता सेंद्रिय उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाईल व त्याकरताच केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना आखण्यात आलेल्या आहेत.

याच सेंद्रिय उत्पादनाचा विचार केला तर यामध्ये सेंद्रिय गुळ उत्पादन हा देखील एक चांगला व्यवसाय असून  उत्तर प्रदेश राज्यातील बागपात येथील एका तरुण शेतकऱ्याने सेंद्रिय गुळाचे व्यवसायातून लाखो रुपये आर्थिक उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात घेऊ.

 हा तरुण शेतकरी वर्षभरात सेंद्रिय गूळ निर्मितीतून कमावत आहे नऊ लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील सूनहेडा या गावचा तरुण शेतकरी विजय याने नैसर्गिक रित्या आणि कुठल्याही प्रकारचे रसायनांचा वापर न करता उसाची लागवड केली व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा उत्पादित केलेला ऊस बाजारपेठेत न विकता त्यापासून काळेसरवर सेंद्रिय गूळ तयार करण्याचा उद्योग सुरू केला.

यामध्ये त्यांनी आठ कर्मचाऱ्यांच्या मदतीने वर्षभर आठ ते नऊ लाख रुपये कमावले. विजय हा त्याने तयार केलेला गूळ दिल्ली तसेच कोलकत्ता आणि राजस्थानला प्रामुख्याने विक्री करतो. तसेच त्याने काही दिवसांपूर्वी सरकारच्या पीएम किसान एपीओ योजनेअंतर्गत नोंदणी देखील केली होती व या अंतर्गत आता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचा विचार करत आहे.

याबाबत बोलताना विजयने सांगितले की, या अगोदर तो फक्त उसाची शेती करत असते. परंतु त्यातूनच विक्री करून मात्र उत्पन्न खूप कमी मिळत असेल. यावर उपाय म्हणून त्याच्या डोक्यात सेंद्रिय गुळ बनवण्याची कल्पना आली व ती कल्पना पूर्णत्वास नेऊन त्याने सेंद्रिय गूळ निर्मिती सुरू करून वर्षाला साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपये सहज या माध्यमातून कमावणे सुरू केले आहे.

 सेंद्रिय गुळ कसा तयार केला जातो?

यासाठी प्रथम प्रक्रिया म्हणजे उसाचे गाळप करणे महत्त्वाचे असते व यामध्ये निघालेला रस एका गरम पॅनमध्ये ओतला जातो. यातील गुळ काळा होऊ नये म्हणून लवकर त्या रसामध्ये जंगली लेडी फिंगरचा वापर केला जातो. अशाप्रकारे तीन पातेल्यामध्ये रसापासून गुळ तयार होईपर्यंत त्याला शिजवला जातो व तिसऱ्या कढईत रस पूर्ण शिजल्यानंतर गुळासारखा होतो.

त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हलवला जातो व कुशल कामगारांकडून महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात व नंतर तो गुळासारखा दिसू लागतो. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काजू, बेदाणे तसेच काळीमिरी इत्यादी घालून तुम्ही त्या गुळाचे छोटे छोटे तुकडे करून देखील विक्री करू शकतात.

तसेच हा गुळ आरोग्यासाठी देखील खूप फायद्याचा असतो. यामध्ये लोह तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणात आढळून येते. सेंद्रिय गुळ हा रसायनमुक्त असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.