Paytm Instant Loan: पेटीएम देईल तुम्हाला घरबसल्या मिनिटांमध्ये 2 लाखांचे कर्ज! वाचा संपूर्ण प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Paytm Instant Loan:- बऱ्याचदा  आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व अशावेळी आपल्याकडे लागणारा पैसा संपूर्णपणे असतोच असे होत नाही. त्यामुळे आपण बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ताबडतोब कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो.

परंतु बँकांच्या माध्यमातून देखील कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक कालावधी लागतो. या दृष्टिकोनातून जर तुम्हाला ताबडतोब कर्ज हवे असेल तर आता अनेक रिझर्व बँकेने मान्यता दिलेले एप्लीकेशन असून या माध्यमातून तुम्ही झटपट कर्ज मिळवू शकतात.

यामध्ये आपल्याला मनी व्ह्यू यासारख्या एप्लीकेशनचे उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. परंतु आता तुमच्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमधील ई वॉलेट असलेले पेटीएम देखील तुम्हाला आता ताबडतोब म्हणजेच पाच मिनिटापेक्षा कमी कालावधीत दोन लाख रुपयांचे कर्ज सुविधा देऊ शकते. याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया

यामध्ये तुम्ही कर्ज साठी अर्ज करण्यापासून ते पैसे आपल्या खात्यापर्यंत पोहोचेपर्यंतचे सर्व प्रक्रिया ऑनलाईन होते. हे कर्ज पूर्णपणे डिजिटल उपलब्ध होणार असल्यामुळे बँकेत जाऊन कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे सबमिट करण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी पेटीएम इन्स्टंट पर्सनल लोन सर्विस सुरू केली असून या सेवेचा फायदा कमी पगाराचे कर्मचारी तसेच छोटे व्यावसायिक यांना होणार आहे.

 कसे मिळेल घरबसल्या कर्ज?

या माध्यमातून पेटीएमच्या युजर्सना घरबसल्या मोबाईलवरून कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय मिनिटातच तुमच्या खात्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम येईल. याकरिता ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन घ्यायचे असेल तर पेटीएम एप्लीकेशन वर जाऊन फायनान्शिअल सर्विसेस ऑप्शन मधील पर्सनल लोन टॅब वर क्लिक करून अर्ज करावा लागणार आहे.

त्यानंतर विचारलेली आवश्यक माहिती तुम्हाला नमूद करणे गरजेचे राहील. नंतर तुम्ही याकरिता पात्र आहात की नाही हे पाहिले जाते व त्यानंतर तुमचे खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.

 तीन वर्षात रक्कम परतफेड करू शकतात

पेटीएम च्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे. या अंतर्गत पर्सनल लोन घेणाऱ्यांना 18 ते 36 महिन्यात कर्जाची रक्कम परत फेडावी लागणार आहे. सध्या पेटीएम ने नवीनतम कर्ज सेवाकरीता अनेक बँका आणि एनबीएफसीसी भागीदारी केली आहे.

 या माध्यमातून कुणाला कर्ज मिळेल?

पेटीएम त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देते. या ग्राहकांनी आतापर्यंत पेटीएम च्या माध्यमातून सर्वात कमी व्यवहार केलेले आहेत किंवा वापरकर्त्यांनी पेटीएम वॉलेट सोबत किती व्यवहार केले. तसेच संबंधित युजर्स वॉलेटमध्ये नेहमी किती पैसे ठेवले जातात. इत्यादी गोष्टी तपासल्या जातात.

 पेटीएम कर्जासाठी अर्ज कसा कराल?

1- पेटीएम पर्सनल लोन मिळवण्याकरिता सगळ्यात अगोदर तुमची पेटीएम खाते पूर्णपणे सत्यापित करणे गरजेचे असून त्यासोबत केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे. केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पेटीएम कर्ज सेवेचा लाभ दिला जाणार नाही.

2- तसेच तुमचे बँक खाते तुमच्या पेटीएम खात्याशी जोडलेले असावे.

3- जर ही प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्ही प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये पेटीएम ची नवीन अपडेट केलेले आवृत्ती इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.

4- त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड लॉगिन करणे महत्त्वाचे आहे.

5- त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल ऑप्शन वर जाल व तिथे तुम्हाला पेटीएम पोस्टपेड लिहलेले दिसेल.

6- पेटीएम पोस्टपेड वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल व या मध्ये तुम्हाला पेटीएम पोस्टपेड बद्दल काही माहिती दिसेल. त्यानंतर तुम्हाला तेथे नेक्स्ट करावे लागेल.

7- त्यानंतर तुम्हाला ओटीपी सह पडताळणी पूर्ण करावी लागेल आणि अर्जाच्या सर्व अटी व शर्ती वाचून फॉर्ममध्ये एक्सेप्ट वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.

8- त्यानंतर तुमचा अर्ज पडताळणी प्रक्रिया करता पेटीएमवर जातो व तुम्ही पात्र असाल तर कर्जाची रक्कम पेटीएम पोस्टपेड वॉलेटमध्ये जोडली जाते.