तुम्ही पेन्शनधारक आहात आणि तुम्हाला कर्ज हवे आहे का? तर एसबीआयची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत! वाचा तपशील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माणसाला कुठल्याही वयामध्ये पैशांची गरज भासू शकते. बऱ्याचदा व्यक्तीवर अनेक विपरीत असे प्रसंग येतात की आपल्याकडील जो काही पैसा असतो तो देखील अपूर्ण पडतो व आपल्याला जास्तीच्या पैशासाठी कर्ज व इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात.

बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन सारख्याच कर्ज सुविधा वापरून पैशांची गरज पूर्ण करतात. बँका देखील कर्ज देताना त्यांच्या पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच कर्ज पुरवठा करतात हे देखील तितके सत्य आहे. तसेच समाजामध्ये अनेक निवृत्त झालेली व्यक्ती असतात व अशा व्यक्तींना दर महिन्याला ठराविक अशी रक्कम पेन्शन स्वरूपात मिळत असते.

तरीदेखील अशा व्यक्तींना काही गोष्टींसाठी अधिकच्या पैशाची आवश्यकता भासू शकते किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्तीचा पैसा लागतो. त्यामुळे वयाच्या या टप्प्यावर कर्ज मिळणे खूप महत्त्वाचे असते. अशा व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी असून जर निवृत्तीवेतनधारक व्यक्तींचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एसबीआयची पेन्शनधारकांसाठी असलेली विशेष कर्ज योजना अशा निवृत्तीवेतनधारक व्यक्तींसाठी फायद्याची ठरते. याच योजनेविषयीची माहिती लेखात घेऊ.

 स्टेट बँक ऑफ इंडियाची पेन्शन लोन स्कीम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवृत्त झालेले व्यक्ती पेन्शन घेत असतील व त्यांचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पैशांची गरज पडली तर अशा व्यक्तींना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पेन्शन लोन स्कीम राबवली जाते व या योजनेच्या माध्यमातून अशा व्यक्तींना बँकेकडून कर्ज मिळू शकते.

लोनचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी लागणारे जे काही प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया शुल्क असते ते खूपच कमी लागते. तसेच कर्ज मिळण्याची प्रक्रिया अतिशय जलद असून खूप कमीत कमी कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते. तसेच यावर आकारले जाणारे व्याजाचे दर हे पर्सनल लोन साठी असलेले व्याजदरांपेक्षा कमी असतात. पेन्शन धारकांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआयचा पर्याय मिळतो व महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही पेन्शन कर्जाकरिता अर्ज करू शकतात.

 पेन्शन लोनसाठी असलेल्या अटी

1- पेन्शनधारकांना जे काही पेन्शन लोन मिळते ते साधारणपणे पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जासारखेच असते. पेन्शन लोन घेण्याकरिता कर्जदाराची पेन्शन पेमेंट ऑर्डर स्टेट बँक ऑफ इंडिया कडे असणे गरजेचे असते.

2- महत्त्वाचे म्हणजे या लोन साठी अर्जदाराचे वय 76 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

3- यामध्ये पेन्शन धारकाला लेखी द्यावे लागते की जो काही कर्जाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पेन्शनधारक कोषागाराला दिलेल्या आदेशात कुठल्याही प्रकारची सुधारणा करणार नाही.

4- तसेच बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत कोषागाराला ते लेखी स्वरूपामध्ये द्यावे लागणार आहे. तसेच पेन्शनधारकाने पेन्शनची रक्कम इतर कुठल्याही बँकेत हस्तांतरित करण्याची विनंती कोषागार स्वीकारणार नाही.

5- जोडीदार( कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र) किंवा योग्य तृतीय पक्षाच्या हमीसह योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती लागू राहतील.

6- पेन्शन कर्जाचा परतफेड करण्याचा कालावधी हा 72 महिन्याचा आहे व या कर्जाची परतफेड वयाच्या 78 व्या वर्षापर्यंत करावी लागते.

 पेन्शन लोन संबंधिची अधिकची माहिती कुठे मिळेल?

1800-11-2211 या टोल फ्री क्रमांक डायल करून तुम्ही याविषयीची माहिती मिळवू शकतात. किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या https://sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील अधिकची माहिती मिळवू शकतात.