प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 ! महिलांसाठी अश्या प्रकारे मिळणार पाच हजार रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांचे सामाजिक आणि कौटुंबिक हित साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने जर आपण दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक कामे करावी लागतात.

त्याचा विपरीत परिणाम हा गर्भवती महिलांवर आणि बालकांवर देखील होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण वाढते व या बाबींना अटकाव व्हावा याकरिता प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली होती व आता या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे.

 प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 चे स्वरूप कसे आहे?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन 2023-24 पासून राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा जो काही संपूर्ण खर्च आहे तो शासनाच्या स्वनिधीतून भागवण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. जर आपण याबाबतीत केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा विचार केला तर या अंतर्गत मिशनशक्ती मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागांमध्ये 14 योजना एकत्रित केल्या आहेत व या सामर्थ्य विभागामध्ये सहा योजना असून यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलेला पहिल्या अपत्याकरिता 5000 रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये आणि दुसऱ्या अपत्ये मुलगी झाली तर मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यामध्ये सहा हजार रुपयांचा लाभ संबंधित महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे.

 या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे

जर आपण या योजनेचे उद्दिष्ट पाहिले तर माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घ्यायला प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी हे प्रमुख उद्दिष्ट असून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य चांगले रहावे व माता मृत्यू व बालमृत्यू दरामध्ये घट व्हावी व तो नियंत्रणात राहावा हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच लाभार्थ्याकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे आणि नवजात अर्भकाच्या जन्मासोबत जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावी हा देखील एक उद्देश आहे.

 या योजनेच्या अटी काय आहेत?

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलेचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच लाभ घेण्यासाठी महिलाही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, 40% व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणारी दिव्यांग, बीपीएल शिधापत्रिका धारक, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी, ई श्रम कार्ड धारक, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी,

मनरेगाचे जॉब कार्ड धारक, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस व आशा कार्यकर्ती यापैकी किमान एका गटातील असणे गरजेचे आहे. तसेच या महिलेने कमीत कमी एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी महिलेचे वय किमान 18 ते कमाल 55 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी महिलेच्या आधार कार्डची प्रत किंवा आधार नोंदणी कागदपत्र, शेवटच्या मासिक पाळीची तारीख व गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसूती पूर्व तपासणीच्या नोंदी असलेल्या परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड, संबंधित लाभार्थी महिलेच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत,

बाळाच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, माता आणि बाल संरक्षण कार्ड वर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत, गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएच पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक, लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

 ऑनलाइन पद्धतीने करू शकता अर्ज

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून सिटीजन लॉगिन मधून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा डाऊनलोड केलेला फॉर्म पूर्ण भरून यामध्ये लाभार्थीने स्वाक्षरी केलेल्या हमी पत्रासह व आवश्यक सर्व कागदपत्रांसह नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करणे गरजेचे आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर महत्त्वाच्या बाबी

यामध्ये पहिल्या अपत्याकरिता शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांक पासून पूर्वी असणारा जो की 730 दिवसांचा कालावधी होता तो आता कमी केला असून तो 510 दिवसांवर आणला आहे. समजा दुसऱ्या अपत्य मुलगी असेल तर तिच्या जन्माच्या तारखेपासून 210 दिवसांपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज संबंधित आरोग्य यंत्रणेकडे द्यावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक असून कालावधी संपून गेल्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. एखाद्या लाभार्थ्यांनी हस्तलिखित फॉर्म जमा केला असेल व या योजनेच्या नवीन संगणक प्रणाली द्वारे कोणत्याही कारणामुळे जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारला जात नसेल तर लाभार्थ्याला लाभ मिळत नाही.