Post Office : पोस्टाची अप्रतिम योजना! गुंतवणुकीनंतर मिळतील पैसे डबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी योजना घेऊन येत असते. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये सर्वात जास्त व्याज मिळते. अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणुकीनंतर पैसे दुप्पट होतील. ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

पोस्ट ऑफिसकडून अनेक बचत योजना चालवण्यात येतात. ज्यात निर्धारित कालावधीत गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असून मिळणारे व्याजही खूप चांगले आहे. ही पोस्ट ऑफिसची वेळ ठेव योजना असून यात गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात. जाणून घेउयात याबाबत सविस्तर.

मिळेल 7.5 टक्के व्याज

हे लक्षात घ्या की टाईम डिपॉझिट हा पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परताव्याच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तुमचे पैसे दुप्पट करण्याची ही योजना आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकार 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.

जाणून घ्या गुंतवणूक कालावधी

गुंतवणूकदार विविध कालावधीसाठी पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी पैसे गुंतवता येईल. तुम्हाला यावर 1 वर्षासाठी गुंतवणुकीवर 6.9 टक्के व्याज मिळेल.

त्यानंतर 2 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के दराने व्याज मिळत असून 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममधील गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते. परंतु गुंतवणुकीवर ग्राहकांना डबल पैसे मिळतात.

किती वर्षात होतात पैसे डबल?

गुंतवणूकदारांनी पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास त्यांना 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. या कालावधीत त्यांना ठेवीवर 2 लाख 24 हजार 974 रुपये गुंतवावे लागणार आहे आणि एकूण गुंतवणुकीची रक्कम 7 लाख 24 हजार 974 रुपये इतकी असणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवलेले पैसे 9.6 वर्षांसाठी गुंतवावे लागतात. यामध्ये गुंतवलेले पैसे इतक्या वर्षांत दुप्पट होतात. म्हणजेच 114 दिवसांत तुम्हाला गुंतवणुकीवर डबल रक्कम मिळते.

गुंतवणुकीवर कर

टाइम डिपॉझिट योजनेमध्ये, ग्राहकांना आयकर कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळत आहे. या बचत योजनेत तुम्ही एकच खाते किंवा संयुक्त खाते चालू करू शकता. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी खाते चालू करता येते. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1,000 रुपयांमध्ये खाते चालू करता येते. यात व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर मिळतात.