PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Surya Ghar Yojana:- सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजना पारंपारिक ऊर्जेचे महत्त्व व जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत.

सौर ऊर्जा हा एक महत्त्वाचा पारंपारिक ऊर्जेचा स्त्रोत असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत संभाव्य ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा वापर हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केली आहे व नुकतीच त्यामध्ये पंतप्रधान सूर्यघर योजनेची भर पडलेली आहे.

ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली असून हिच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी घरांच्या छतावर सोलर रूफटॉप बसवण्यात येणार असून यासाठीची महत्वाची अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत वीज मोफत पुरवली जाणार आहे व एवढेच नाही तर एक कोटी घरांना सवलतीच्या दरामध्ये सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 या योजनेअंतर्गत सोलर सिस्टमसाठी किती मिळणार अनुदान?

पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या माध्यमातून एक किलोवॅट क्षमतेचे रूप-टॉप सोलर सिस्टम बसवण्याकरिता तीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दोन किलो वॅट रूफ टॉप सोलर सिस्टमकरिता 60 हजार व तीन किलोवॅट रूप-टॉप सोलर सिस्टम करिता 78 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

 कुणाला मिळणार या योजनेचा लाभ?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

2- सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

3- तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयेपेक्षा जास्त असता कामा नये.

4- अर्जदाराकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही लागणारी आवश्यक कागदपत्र आहेत ती त्याच्याकडे असणे गरजेचे आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराकडे अर्ज करताना रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, विज बिल, रहिवासी दाखला, बँक खात्याचा तपशील( बँकेचे पासबुक), मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो असणे गरजेचे आहे.

 या योजनेसाठी अशा पद्धतीने करा अर्ज

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता व याकरिता तुम्हाला सर्वप्रथम पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्या ठिकाणी गेल्यावर होम पेजवर तुम्हाला अप्लाय फॉर रूपटॉप सोलर या टॅब वर क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल व त्या पेजवर तुम्हाला राज्य, तुमचा जिल्हा तसेच वीज वितरण कंपनी आणि वीज ग्राहक क्रमांक टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल.

4- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल व त्या ठिकाणी नोंदणी अर्जाचा नमुना तुमच्यासमोर येईल. या नोंदणी अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती योग्य रीतीने भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

5- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे व अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यानंतर पूर्ण होते. त्यानंतर केलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.