SIP Investment : फक्त 150 रुपयांची बचत करून व्हाल लखपती, ‘अशी’ करा गुंतवणूक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIP Investment : सध्या महागाई इतकी वाढली आहे की, प्रत्येक कामासाठी लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. तसेच महागाईच्या या जमान्यात मुलांचे शिक्षणही खूप महाग झाले आहे. सध्या मुलांना शिक्षण देणे इतके महाग झाले आहे जे पालकांसाठी त्रासाचे कारण बनले आहे. अशातच मध्यमवर्गीय लोकांना उच्च शिक्षण घेणे खूप कठीण होत चालले आहे.

तुम्हीही अशा परिस्थितीला तोंड देत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी अगदी मुलगा लहान असल्यापासून बचत करायला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. आजच्या या लेखात, आम्ही तुम्हाला तुमच्या मुलासाठी कोणतेही कर्ज न घेता उच्च शिक्षण कसे मिळवू शकता ते सांगणार आहोत.

दररोज फक्त 150 रुपयांची बचत करा…

तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी तुम्हाला मोठी बचत करण्याची गरज नाही. लहान बचत करून तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. समजा 2023 मध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी 3 वर्षांची आहे आणि तो किंवा ती 18 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला मोठा निधी जमा करण्याचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी करू शकता. तुम्ही येथे गुंतवणूक करून अगदी 22 लाख पयांचा निधी जमा करू शकता. कसे? जाणून घ्या…

22 लाख रुपयांचा निधी कसा तयार होईल ?

तुमची मुलगी किंवा मुलगा 3 वर्षांचा आहे तर तुम्हाला १५ वर्षांसाठी दररोज फक्त 150 रुपये वाचवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात ४५०० रुपये आणि वर्षभरात ५४ हजार रुपये वाचवाल.

तुम्हाला ही गुंतवणूक १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल, अशा प्रकारे १५ वर्षांत तुम्ही एकूण ८ लाख १० हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवाल.

SIP मध्ये सरासरी दीर्घकालीन परतावा 12 टक्के आहे. त्यानुसार 15 वर्षात तुम्हाला 14 लाख 60 हजार 592 रुपयांचे फक्त व्याज उत्पन्न मिळेल. जेव्हा ही SIP 15 वर्षांमध्ये परिपक्व होईल, तेव्हा तुम्हाला एकूण 22 लाख 70 हजार 592 रुपये मिळतील.