Tax Discount On Home Loan: होम लोन घेतले असेल तर व्याजावर मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत सूट! कसा घ्याल फायदा? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tax Discount On Home Loan:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते व ते एखाद्या मोठ्या शहरांमध्ये असेल तर खूप चांगले अशा प्रकारची इच्छा बऱ्याच व्यक्तींची असते. परंतु सध्या महागाईच्या कालावधीमध्ये घराच्या बांधकाम साहित्याचे वाढलेले दर, जागांचे वाढलेले भाव आणि त्यामुळेच घरांच्या किमती देखील प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्याने

एखाद्या मोठे शहरात काय परंतु ग्रामीण भागात देखील स्वतःचे घराकरिता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अशा प्रकारचा खर्च प्रत्येक जण करू शकेल किंवा प्रत्येकालाच परवडेल असे नसते. परंतु आता सरकारच्या माध्यमातून देखील स्वतःचे घर असावे किंवा व्यक्ती बेघर राहू नयेत या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येत आहेत

व दुसरी बाब म्हणजे बँकांच्या माध्यमातून आता होम लोन म्हणजेच गृह कर्ज घेणे सोपे झाल्यामुळे आता बऱ्याच व्यक्तींना होम लोन च्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. साहजिकच होम लोन घेतल्यानंतर आपल्याला त्यावर व्याज द्यावे लागते.

परंतु त्यामुळे आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही होम लोन घेतले असेल व त्यावर तुम्ही व्याज भरत असाल तर आयकर कायद्याच्या अंतर्गत कलम 24, कलम 80C आणि कलम 80E अंतर्गत करामध्ये मोठी सूट मिळू शकते.

समजा तुम्ही गृह कर्ज घेतले आहे व त्यावर व्याज भरत आहात तर कलम 24 च्या माध्यमातून तुम्ही त्या व्याजावर एका आर्थिक वर्षामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही व्याजावर कमाल दीड लाख रुपयापर्यंत सूट मिळवू शकतात व त्यासोबतच आयकर कायद्याच्या कलम 80E अंतर्गत तुम्ही गृह कर्जाच्या व्याजावर जास्तीत जास्त 50000 पर्यंत सूट मिळवू शकतात.

 होम लोनवर कर सवलतीचा लाभ कसा मिळवाल?

1- यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये घेतलेल्या होम लोनवर जे काही व्याज आकारण्यात येते त्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते व या सवलतीमुळे कर्ज धारकावर जो काही करांचा बोजा असतो तो कमी व्हायला मदत होते.

2- यामध्ये करदात्यांनी जर होम लोनची मूळ रक्कम बँकेत परत केली तरीदेखील त्याला कर लाभ मिळतो. अशा प्रकारचा लाभ घेण्याकरिता करदाता हा आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचा दावा करू शकतो.

3- समजा तुम्ही या वर्षी घर खरेदी केले असेल तर तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावर देखील आयकरचा लाभ घेऊ शकता व याकरिता तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत हा लाभ मिळत असतो व या माध्यमातून तुम्ही कमाल दीड लाख रुपये पर्यंत फायदा मिळवू शकतात.

4- समजा दोन किंवा अधिक लोकांनी म्हणजे संयुक्तरित्या होमलोन घेतले असेल तरी देखील सरकार त्यांना करामध्ये सूट देत असते व या प्रकारांमध्ये देखील व्याजावर दोन लाख रुपये आणि मूळ रकमेवर दीड लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.