Business Success Story: वडापाव विकून ‘या’ व्यक्तीने उभे केले कोट्यावधींचे साम्राज्य! कसे केले शक्य? वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Success Story:- एखादी छोटीशी कल्पना किती मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकते याचे अनेक उदाहरणे आपल्याला या समाजात दिसून येतात. डोक्यामध्ये आलेल्या कल्पनेला वास्तविक स्वरूपामध्ये आणण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न, जिद्द, सातत्य आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी इत्यादी गुण असले तर कल्पना ही वास्तविकेत उतरते आणि एवढेच नाही तर ती उंच भरारी देखील घेते.

अगदी हाच मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर गोली वडापाव विकणारे उद्योगपती वेंकटेशन अय्यर यांची यशोगाथा आपल्याला पाहता येईल. या व्यक्तीने जीवनाच्या वाटेवर जे काही संघर्ष आणि परिस्थिती आली त्यांच्याशी दोन हात करत वडापाव विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधींचा बिजनेस उभा केला आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 वडापाव विकून उभे केले कोट्यावधींचे साम्राज्य

एखाद्या व्यक्तीने वडापाव विकून कोट्यावधींचा व्यवसाय केला आहे हे जर आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु ही बाब सत्य आहे. ही अशक्य गोष्ट व्यंकटेशन अय्यर या व्यक्तीने खरी करू दाखवली असून वडापाव विकून या व्यक्तीने कोट्यावधींचा व्यवसाय आज उभा केलेला आहे.

अय्यर यांनी साधारणपणे 2004 मध्ये गोली वडापावची स्थापना केली व हे स्टार्टअपने आता मोठी भरारी घेतली असून ग्राहकांच्या प्रचंड प्रमाणात पसंतीस उतरलेला हा गोली वडापाव असून त्याचा दर्जा आणि स्वच्छता तसेच रेट देखील कमी असल्यामुळे ग्राहकांचा तो पहिल्या पसंतीचा वडापाव ठरताना दिसून येत आहे.

वेंकटेशन अय्यर हे हा गोली वडापावविकून आज कोट्यावधींचे मालक झाले आहेत. कुठलीही गोष्ट याची सुरुवात केली म्हणजे त्यामध्ये असंख्य प्रकारच्या, नाना तऱ्हेच्या अडचणी या पाचवीलाच पुजलेल्या असतात व तसेच अडचणी त्यांना देखील आल्या. यामध्ये जेव्हा त्यांनी वडापाव विक्रीला सुरुवात केली तेव्हा ते हाताने वडापाव तयार करत होते.

या पद्धतीत वडापाव ची शेल्फ लाइफ अत्यंत कमी होती. त्यामुळे ग्राहकांकडून अनेकदा नकारार्थी कमेंट देखील आल्या. त्यातच वडापाव साठी लागणारा कच्च्या मालाच्या किमतींमध्ये 2004 या वर्षात वाढ झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. या सगळ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

 ग्राहक वाढवण्यासाठी घेतले प्रचंड कष्ट

वडापावची गुणवत्ता वाढावी याकरिता त्यांनी आऊटसोर्सिंग आणि ऑटोमेशन सारख्या युक्ती योजिल्या. यांचे काही मित्र चिकन पॅटीस आणि फ्रोजन भाजीपाला पुरवण्याचा व्यवसाय करत होते व त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी वडापाव व्यवसायातील शेल्फ लाईफची समस्या सोडवली.

त्यानंतर स्वतःचे एक फायर मशीन स्थापन केले व त्यामुळे कामकाज वेगात होऊ लागले व त्याचे कार्यक्षमता सुधारली. टप्प्याटप्प्याने मार्केटवर लक्ष केंद्रित करून त्यांचा ब्रँड वाढीस लागला व त्यांचा व्यवसाय विस्तारत केला. आज जर आपण त्यांच्या या गोली वडापाव व्यवसायाचा विस्तार पाहिला तर संपूर्ण देशामध्ये जवळपास 90 ठिकाणी गोली वडापाव चे 350 आऊटलेट आहेत.

जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा अपेक्षेप्रमाणे लोकांनी त्यांना हा व्यवसाय चालणार नाही अशी खिल्ली उडवायला देखील सुरुवात केलेली होती. परंतु कालांतराने त्यांच्या या कल्पनेला इन्वेस्टर मिळाला व म्हणता म्हणता या छोट्या व्यवसायाचे वटवृक्षात रुपांतर झाले.

अशाप्रकारे वेंकटेश अय्यर यांनी परिस्थितीवर मात करत एका साध्या कल्पनेला आज मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतरित केले असून कोट्यावधींचा व्यवसाय उभारला आहे.