Ahmednagar Cooperative Bank : रात्री पवारांनी बैठक घेतली, बँक आपल्याच ताब्यात येणार असताना फडणवीसांनी केली जादू, नगरमध्ये रंगली चर्चा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Cooperative Bank : काल अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जास्तीचे संचालक असताना देखील पराभव कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या निवडणुकीआधी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संचालकांची बैठक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती.

या बैठकीला आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे इत्यादी संचालक उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव फायनल झाले. ते निवडून येणार असे निश्चित असताना आघाडीची मते फुटली आणि शिवाजी कर्डिले अध्यक्ष झाले.

यामुळे महाविकास आघाडीला एकच धक्का बसला. यामुळे बैठकीला तर सगळे संचालक उपस्थित असताना असे कसे घडले असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र रात्रीत गणित बदलली आणि आघाडीची चार मते फुटली. यामुळे हे चारजण कोण आहेत, अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रात्री सर्वांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तिथेच सगळी सूत्रे फिरली. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले.

यामुळे आता बँकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी मोठी शक्ती पणाला लावली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे.