Ajit Pawar : अजितदादांच्या मनात होता वेगळाच प्लॅन, पण घडलं वेगळंच, दादांना मोठा धक्का…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajit Pawar : आज चिंचवडचा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आखलेली सगळी रणनीती पाण्यात गेली. अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं.

आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. पण शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचंच काही चालत नाही. यामुळे दादांना मोठ्या पराभवाचा सामोरे जावे लागले. नाना काटे यांच्या रुपात अजित पवार यांनी मोठा डाव खेळला.

२०१७ नंतर पिंपरी चिंचवडवरचं गमावलेलं अस्तित्व मिळविण्यासाठी अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. मात्र यश आले नाही. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपच्या अश्विनी जगताप यांना झाला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिंचवडच्या जागेवर दावा केलेला. नंतर अजित पवार यांनी प्लॅन केला आणि सूत्रे फिरवली. कलाटे राष्ट्रवादीतून लढतील, अशी शक्यता निर्माण केली. अजितदादांनी कलाटेंच्या नावावर शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादीकडे घेतली.

तसेच ऐनवेळी राहुल कलाटे यांच्याऐवजी नाना काटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नाना काटे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यावर आपला होल्ड कसा राहिल, याची पुरेपूर काळजी अजित पवार यांनी घेतली.

तसेच चिंचवडची सगळी सूत्रं आपले खास आणि विश्वासू आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे सोपवली. निवडणूक काळात तर अजितदादांनी चिंचवडमध्ये ठाण मांडलं. सगळे नगरसेवक-पदाधिकारी-कार्यकर्ते कामाला लावले. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

एक काळ होता या शहरात अजित पवार जे बोलतील तीच पूर्वदिशा होती. मात्र त्यांचे पुत्र पार्थ पवार याच ठिकाणी पराभूत झाले. अनेक आमदार सोडून गेले. यामुळे पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी दादा तयार होते. मात्र पुन्हा एकदा निराशा झाली.