Ajit pawar : चिंचवडमध्ये ‘नोटा’ चे बटन दाबण्याचे मुस्लिम समाजाचे आवाहन, अजित पवारांनी थेट भेटच घेतली, कारण आले पुढे..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajit pawar : पुण्यात सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत एक विषय पुढे आला आहे. हा विषय म्हणजे मुस्लिम मतदारांचा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. यामुळे ही मते महत्वाची ठरणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने एक निर्णय घेतला आहे.

मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही दुर्लक्ष केलेले असल्याने त्यांच्या उमेदवारांना मतदान न करता `नोटा`चे बटन दाबण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार स्वत: अजित पवार हे आपले राष्ट्रीय सरचिटणीस सुभानअली शेख यांना घेऊन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव गुलामभाई शेख यांना आज भेटले.

दरम्यान, स्थानिक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी तुमची प्रलंबित कामे माझ्याकडून करवून घेतली नाहीत, असे ते म्हणाले. त्यासंदर्भात आपल्यालाही भेटलो होतो, याकडे गुलामभाई यांनी लक्ष वेधले. यामुळे आता मतदान होणार की नाही हे लवकरच समजेल.

दरम्यान, पिंपरी चिंचवडचा विकास झाला आहे. हे मान्य देखील असून त्याचे कौतूकही आहे. पण या विकासात मुस्लिम समाजाला स्थान कोठे आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसेच पिंपळे सौदागर येथील जुन्या दफनभूमीतील कबरी कोणालाही विश्वासात न घेता रात्रीच्या वेळी तोडल्या गेल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबरोबरच आरक्षण, कत्तलखाना, उर्दू शाळा, होणारे हल्ले यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, उद्या पिंपरी चिंचवडमध्ये उद्या मतदान होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. यासाठी जोरदार प्रचार केला गेला. यामुळे आता निकालाकडे लक्ष लागले आहे.