Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता निवडणुकीत मिटकरी जादू दाखवणार का? हे येणाऱ्या काळातच समजेल. माझ्या पक्षाने संधी दिल्यास अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार!

सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचारग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. याविरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता पक्ष देखील त्यांना संधी देणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही, असेही ते म्हणाले. आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आक्रमक नेते आहे. ते शिंदे फडणवीस सरकारवर विविध मुद्द्यांवरुन सातत्याने हल्लाबोल करत असतात.

ते केंद्रातील मोदी सरकारवरही सडकून टीका करतात, तसेच पवारांचे जवळचे मानले जातात. दरम्यान, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड वर्षापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. यामुळे हीच संधी मिटकरी साधू शकतात.

आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता आमदार मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.