Chandrasekhar Bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं खरेखुरे कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chandrasekhar Bawankule : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. आता पराभव का झाला याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारण सांगितले आहे. ते म्हणाले, कसब्यात काँग्रेसच्या विजयाचे खरे श्रेय हे तेथील उमेदवाराचे आहे. त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये छुपी सहानुभूती होती.

त्याचा फायदा त्यांना झाला. धंगेकर हे दोन-तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढलेले आहेत. मात्र, हेमंत रासने हे पहिल्यांदा लढले. तसेच धंगेकरांनी शेवटच्या दिवशी उपोषण केलं आणि त्यामधून त्यांना सहानुभूती मिळाली”, असं बावनकुळे यांनी सांगितलं

आम्ही पैशाचा वापर करून कधीच निवडणूक लढवल्या नाहीत. आमचा तो स्वभाव नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची परंपरा आहे, आमची नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, धंगेकर यांच्या विजयामुळे यावेळी कार्यकर्त्यांनी एकच घोषणा दिल्या. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक झाली.

भाजपने पैशांचा पाऊस पाडला तर लोकांनी मतांचा पाऊस पडल्याचे धंगेकर म्हणाले. भाजपचा बालेकिल्ला वा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांमधील लोकांनी यो पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंऐवजी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे.