Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harshvardhan Jadhav : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

जाधव म्हणाले, तेलंगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करायचे म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. लवकरच संभाजीनगरमध्ये मोठी सभा होणार आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या भारत राष्ट्रीय समिती या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. शेती विषयावर काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी त्यांनी आपल्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांचे केसीआर यांनी स्वतः जाधव यांच्या गळ्यात गुलाबी रुमाल घालत त्यांचे पक्षात स्वागत केले.लवकरच छत्रपती संभाजीनगरात के. चंद्रशेखर राव यांची सभा घेवून जाधव आपल्या समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत जाधव म्हणाले, शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज, प्रत्येक हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठी पाच हजार रुपये आणि शेतात पिकवलेले धान्य हमीभावा प्रमाणे खरेदी हे मोठे काम असल्याचे त्यांनी सांगितले.