Shivsena Symbol : ‘आधी अनेक चोऱ्या झाल्या असतील पण आता अख्खा पक्षच चोरीला गेलाय’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shivsena Symbol : शिवसेना आणि धन्यष्यबाण हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. असे असताना आता महाविकास आघाडी शिंदे गटावर आरोप करत आहे. सध्या पुण्यात पोट निवडणूकीचे वारे वाहत आहे.

यामध्ये पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शिंदेगटावर निशाणा साधला. ते म्हणाले, आजवर अनेक चोऱ्या झाल्या असतील. पण पक्षाची चोरी झाली हे कधी ऐकलं होतं का? पण आता अख्खा पक्ष चोरीला गेला आहे.

प्रत्येकाला सांगायला हवं हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका प्रत्येक मतदाराना सांगा. उध्दव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह चोरले. महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

तसेच एक संघ राहून भाजपला विरोध केला पाहिजे. आपली मते फुटली नाहीत पाहिजेत. अनेक ठिकाणी आम्ही विनंती केली पोटनिवडणुक बिनविरोध करा, तेव्हा ऐकलं नाही. तरीही पंढरपूर वगळता आपण सगळ्या पोटनिवडणुका जिंकल्या, असेही ते म्हणाले.

दरम्यान, एका बाजूला पोटनिवडणूकीचा प्रचार सुरू आहे. तसेच दुसऱ्या बाजूला शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. यामध्ये सध्या महाविकास आघाडी ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांनी देखील ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आहे. आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.