Ujjwal Nikam : ठाकरे गटाला हा धक्का म्हणता येणार नाही! जेष्ठ वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ujjwal Nikam : सध्या शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना गेले आहे. यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका दखल केली होती.

त्यावर पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार असल्याचे सांगत दोन आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या वकिलासह निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे याची चर्चा आज सुरू होती. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जात असताना आता जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, ठाकरे गटाला हा धक्का म्हणता येणार नाही असे म्हंटले आहे. तसेच ठाकरे गटाने केलेली मागणी बघता इतकी महत्वाची हा मुद्दा आहे का ? त्याने काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावर स्थगिती देईल अशी शक्यता नव्हतीच, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोग आणि शिंदे यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. दोन्ही बाजूचे ऐकून घेऊन न्यायालय निर्णय घेऊ शकेल, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. सध्या ठाकरे गटाच्या वकिलांनी जो आक्षेप घेतला आहे.

त्यावर उत्तर आल्यावर ठाकरे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे महत्वाचे असेल तरच ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या की नाही हे स्पष्ट होईल, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.