Mhada News: काय म्हणता मुंबईत आता 8 लाखात मिळेल 1 बीएचकेचा फ्लॅट! काय आहे म्हाडाची योजना?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News:- प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर असावे ही मनापासून इच्छा असते व तेही पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असले तर उत्तम. परतु जर आपण या शहरांमध्ये असलेले जागेचे आणि घरांचे दर पाहिले तर ते सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिक आवाक्याबाहेरचे असतात.

कारण या ठिकाणी जागांचे आणि घरांचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येण्यात खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण निर्माण होते. अशा व्यक्तींसाठी म्हाडा हा एक चांगला पर्याय आहे. आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील घरांसाठी सोडत काढली जाते व या सोडतीमध्ये नाव आलेल्यांना म्हाडाच्या अटी व शर्तीनुसार घरांचा लाभ दिला जातो.

अगदी याच अनुषंगाने आता मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून तुम्ही स्वस्तात  वन बीएचके चा फ्लॅट घेऊ शकतात व त्यासाठी म्हाडाने अनेक वर्षापासून रिकाम्या अवस्थेत पडलेल्या घरांच्या विक्रीकरिता नवीन धोरण जाहीर केले आहे. याचा संबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 काय आहे म्हाडा प्राधिकरणाचे नवीन धोरण?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पमध्ये 2000 पेक्षा जास्त घरांची विक्री झालेली नसल्यामुळे अशा घरांसाठी आता म्हाडाच्या माध्यमातून एक नवीन धोरण जाहीर करण्यात आलेले असून या धोरणाची आता अंमलबजावणी करण्यात येत असून या ठिकाणची घरे विकण्याचा निर्णय म्हाडाच्या  माध्यमातून घेण्यात आला आहे.

या नवीन धोरणामध्ये आता पाच पर्याय देण्यात आलेले असून या पाचही पर्यायांचा अवलंब करून घरे विकण्याचा प्रयत्न कोकण मंडळाकडून करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याकरिता लवकरच जाहिराती देखील प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

अशा पद्धतीने पडून असलेल्या घरांच्या किमती कमी केले जातील अशी देखील शक्यता समोर आली आहे. विरार-बोळींज या ठिकाणी कोकण मंडळाचा दहा हजार घरांचा प्रकल्प आहे. परंतु या ठिकाणी असलेल्या घरांच्या बाबतीत पाहिले तर पाण्याची समस्या असल्यामुळे त्या ठिकाणची घरांची विक्री झाली नसल्याचे सध्या चित्र आहे.

या घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाकडून बऱ्याचदा लॉटरी काढण्यात आली परंतु तरी देखील घरांची विक्री न झाल्याने कोकण मंडळाचे यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील 11000 पेक्षा जास्त घरांची विक्री करण्याचे नवीन धोरण म्हाडा प्राधिकरणाने जाहीर केलेले आहे.

महत्वाचे म्हणजे आता  या ठिकाणी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांना सूर्या प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता झाल्याने आणि नवीन धोरण घरांच्या विक्रीकरिता आल्यामुळे या घरांची विक्री होईल अशी एक अपेक्षा कोकण मंडळाला आहे. याकरिता आता या घरांच्या विक्रीकरिता जाहिरात किंवा निविदा काढून पाच पर्यायांच्या माध्यमातून या घरांची विक्री केली जाणार असल्याचे देखील समोर आलेले आहे.

जवळपास संपूर्ण राज्यात 11000 पेक्षा अधिक घरे विक्री अभावी पडून असून ही घरे तीन हजार कोटी रुपये किमतीचे असल्याने या घरांची विक्री न झाल्याने म्हाडाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

त्यामुळे आता हे नवीन धोरण लवकरात लवकर राबवण्यात येणार असून त्याकरिता निविदा किंवा जाहिरात काढून घरे विकण्यात येणार आहेत.या नवीन धोरणानुसार आता घरांच्या किमती कमी केली जाण्याची शक्यता असल्यामुळे परवडणारे किमतीत वन बीएचके चा फ्लॅट या ठिकाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.