Real Estate: मुंबईमध्ये आहे 2 बीएचके घरांना प्रचंड मागणी! तुम्हाला देखील घ्यायचे आहे का मुंबईत 2 बीएचके? वाचा किमती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Real Estate:- रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर पुणे तसेच मुंबईसारख्या शहरांमध्ये सध्या या क्षेत्राला सुगीचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. आपण मुंबईचा विचार केला तर मुंबई आणि परिसरामध्ये 2023 या एकच वर्षामध्ये साधारणपणे दीड लाख पेक्षा जास्त घरांची विक्री करण्यात आलेली आहे.

या आकडेवारीवरून आपल्याला  रियल इस्टेट बद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. जर आपण सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला प्रत्येकाचे स्वप्न असते की मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे वन बीएचके किंवा टू बीएचके म्हणजेच दोन बेडरूम हॉल किचन असलेले घर असावे. कारण जर आपण सध्या मुंबईचा विचार केला तर त्या ठिकाणी वन बीएचके पेक्षा टू बीएचके घरांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र आहे.

सध्या वन बीएचके पेक्षा टू बीएचके घरांना जास्त मागणी असल्याचे दिसून येत असल्यामुळे  मुंबई शहर व उपनगरातील जे काही बिल्डर आहेत त्यांनी देखील आता त्यांच्या हाउसिंग प्रोजेक्ट मधून वन रूम हॉल किचन ऐवजी टू बीएचके चे बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू केल्याचे दिसून येते.

जर आपण मुंबईमधील टू बीएचके घरांच्या किमतींचा विचार केला तर सर्वात जास्त किमती या पश्चिम उपनगरामध्ये आहेत. जर आपण या वर्षाच्या म्हणजेच 2024 च्या सुरुवातीचे पहिले दोन महिने पाहिले तर मुंबई व उपनगरामध्ये दोनच महिन्यात 22000 घरांची विक्री झाली व त्यातल्या त्यात सर्वात जास्त संख्या ही टू बीएचके घरांची होती. यावरून आपल्याला दिसून येते की सध्या मुंबईमध्ये टू बीएचके घरांच्या खरेदी कडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

 किती आहेत मुंबईमध्ये टू बीएचकेच्या किमती?

मुंबई शहर व परिसर तसेच पूर्व उपनगरी व पश्चिम उपनगरे या तीनही ठिकाणी घरांच्या किमती वेगवेगळ्या असल्याचे दिसून येते. उदाहरणच घ्यायचे झाले तर मुंबई शहरांमध्ये 630 ते 700 चौरस फुटाचे  आकारमान असलेल्या घराची किंमत बघितली तर ती दीड कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. जर आपण विभागनिहाय किमती पाहिल्या तर…

1- पश्चिम उपनगरामध्ये 75 लाख रुपयांपासून पुढे घरांच्या किमती असून पूर्व उपनगरातील घरांच्या मानाने या ठिकाणच्या किमती जास्त आहेत.

2- पूर्व उपनगरामध्ये बरेच विकास प्रकल्प सुरू असून त्यातील काहींची सुरुवात झालेली आहे तर काही आता नियोजनाच्या टप्प्यामध्ये आहेत. पूर्व उपनगरा मधील जर आपण घरांच्या किमती पाहिल्या तर त्या 55 लाख किंवा त्यापेक्षा पुढे आहेत.

 मुंबईमध्ये घरांच्या खरेदीविक्रीत वाढ होण्याची काही प्रमुख कारणे

जर आपण गृहनिर्माण संस्थांच्या खरेदी विक्री व ट्रेंड पाहिला तर या गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या सर्वेक्षण संस्थांच्या मते, 2023 या वर्षांमध्ये ज्या लोकांनी टू बीएचके घरांची खरेदी केली त्यामध्ये सर्वाधिक वाटा या लोकांचा होता ज्यांची घरे आधी होती व त्या घरांची विक्री करून त्यामध्ये जो पैसा आला त्यात वाढीव कर्जाची उचल करत बऱ्याच व्यक्तींनी घरे घेतली.

तसेच दुसरे म्हणजे गेल्या दीड वर्षाचा विचार केला तर मुंबईमध्ये रियल इस्टेट उद्योगांमध्ये तेजी आली असून यामध्ये ज्या लोकांची घरे मेट्रो किंवा इतर विकास कामांच्या जवळ होती. अशा लोकांनी त्यांची घरे विकली व त्यांना चांगल्या पद्धतीने भाव मिळाला व पैसा देखील मोठ्या प्रमाणात मिळाला. अशा लोकांनी त्यांना मिळालेल्या पैशांमध्ये दुसरे पैसे टाकून मोठ्या घरांची खरेदी केली असे देखील विश्लेषण या माध्यमातून केले गेले आहे.