बारावी पास विद्यार्थ्यांना सरकार देणार 50 हजाराची रक्कम, पहा कोणाला मिळणार पैसे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Pass Student Will Get Scholarship : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. विविध उपक्रम शासन आपल्या पातळीवर राबवत असते. या योजनांचा आणि उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांचे हित जोपासण्याचे प्रयत्न केले जातात.

यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील हित जोपासण्यासाठी विविध निर्णय शासन घेत असते. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून बारावी पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केंद्र शासनाकडून पुरवली जात आहे.

यामध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा ते वीस हजारापर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना 50000 पर्यंतची शिष्यवृत्ती केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळत असते.

या शिष्यवृत्तीसाठी मात्र विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणत्या घटकातील विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते आणि यासाठी कसा अर्ज करावा लागतो यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- जैविक किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे वरदान ! घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, पहा….

कोणत्या घटकातील विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते?

बारावी पास आऊट झाल्यानंतर जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्यांना केंद्र शासन शिष्यवृत्ती पुरवते. ही शिष्यवृत्ती 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनाच पुरवली जाते.

यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 15 टक्के शिष्यवृत्ती मिळते, तसेच अनुसूचित जमाती अर्थातच एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 7.5% शिष्यवृत्ती मिळते, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27% शिष्यवृत्ती मिळते, अपंग विद्यार्थ्यांना देखील पाच टक्के शिष्यवृत्ती केंद्र शासन पुरवते.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….

अर्ज कसा करावा लागतो?

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्तीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागतो. शिष्यवृत्तीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर त्या वेबसाईटवरील होम पेजवर असलेल्या सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज एंड यूनिवर्सिटी स्टूडेंट्स या आशयाच्या पर्यावर क्लिक करायचे आहे.

येथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात सर्व आवश्यक माहिती पहावयास मिळेल. ही माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील त्यांनीच मग शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे. यासाठी होम पेजवरील न्यू रजिस्ट्रेशन अर्थातच नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….

जर याआधीच विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असेल तर त्यांनी त्यांचे लॉगिन डिटेल्स वापरून या ठिकाणी लॉगिन घ्यायचे आहे. लॉगिन घेतल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. तसेच नवीन नोंदणी करणारे विद्यार्थी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

याआधी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी 60% किमान गुण मिळवले आहेत तेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र राहतील याची नोंद घ्यायची आहे.

निश्चितच, केंद्र शासनाची ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेताना मोठी दिलासादायक सिद्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर येणारा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.

हे पण वाचा :- आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस