50 Hajar Protsahan Anudan : मोठी बातमी ! ‘या’ दिवशी येणार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Protsahan Anudan : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी सार्वजनिक झाली असून या दोन्ही यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे.

लातूर जिल्ह्यात देखील प्रोत्साहन अनुदान वितरण सुरू आहे. जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ पात्र लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार २४४ जणांना विशिष्ट क्रमांक मिळाला असून, १ लाख २५ हजार ५९१ जणांची ई-केवायसी झालेली आहे.

तर ५ हजार ६५३ शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. दरम्यान केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या शेतकरी बांधवांची केवायसी अभावी रक्कम रखलेली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच ही रक्कम मिळावी म्हणून केवायसी करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

अशा परिस्थितीत आता तिसरी यादी नेमकी केव्हा येईल हा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरं पाहता, ही योजना गेल्या चार महिन्यांपासून राबवली जात आहे. प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूचं आहे. लातूर जिल्ह्यात पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत.

तर अद्यापही ५३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, तिसऱ्या यादीत या शेतकऱ्यांना नाव येण्याची प्रतीक्षा असली तरी तिसरी यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे. जाणकार लोकांच्या मते, दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना रक्कम मिळाल्यानंतर शासनाकडून तिसरी यादी जारी केली जाईल आणि उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान वितरित केले जाईल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात, ‘या’ दिवशी येणार तिसरी यादी…