शेतकऱ्यांनो, कर्जाच टेन्शनच मिटलं ! ‘या’ योजनेतून कमी व्याज दरात मिळतय कर्ज; योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल? अर्ज अन कागदपत्राची माहिती वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Loan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. याशिवाय राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे.

वास्तविक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येत नसल्याने भांडवल उभारणीसाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून कित्येकदा शेतीचा खर्चही भागवता येत नाही.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. मात्र अधिक व्याज दरामुळे शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज देखील परवडत नाही. हीच परिस्थिती ध्यानात घेऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी अल्प व्याजदरात तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिल जात आहे. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच कर्ज शेतकऱ्यांना मिळतं जे की कोणत्याही सहकारी बँक तसेच ग्रामीण बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होतं.

पी एम किसान योजनेसाठी लाभार्थी असलेले शेतकरी बांधव किसान क्रेडिट कार्ड साठी देखील पात्र ठरतात. म्हणजेच प्रामुख्याने गरिब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू झाली आहे. दरम्यान आता आपण या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, जमिनीची कागदपत्रे, मतदार ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या बँकेत अर्ज करावयाचा आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.

संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर त्या वेबसाईटवरील किसान क्रेडिट कार्डचा ऑप्शन शेतकऱ्यांना निवडावा लागेल.

किसान क्रेडिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे.

यानंतर या योजनेसाठी आवश्यक अर्ज शेतकऱ्यांना भरावा लागेल. या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागते.

यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून हा अर्ज सबमिट करावा लागतो.

यानंतर ज्या बँकेत शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असतो त्या बँकेकडून दोन ते तीन दिवसात संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधला जातो. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बँकेच्या माध्यमातून वेरिफाय केली जाते.

जर संबंधित शेतकरी बांधवांनी भरलेली माहिती योग्य असेल आणि ते या योजनेसाठी पात्र राहतील तर त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. 

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाईन अर्ज कसा करावा  

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँकेत जावे लागेल.

यानंतर बँकेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत दिल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल.

यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी बँकेच्या माध्यमातून केली जाईल आणि सर्व कागदपत्रे आणि पात्रता यांच्या व्हेरिफिकेशन केल्यानंतर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर होईल.