Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगरच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; जिल्हा परिषदेत एक हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Zilla Parishad Recruitment : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती आयोजित होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील पदभरती मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.

Ahmednagar Zilla Parishad Recruitment : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती आयोजित होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील पदभरती मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरतीबाबत सूचना दिल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यानुसार आता अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत जवळपास एक हजाराहून अधिक रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेतील विविध विभागातील ही एकच राहून अधिक रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…

यात 31 मार्च 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळातर्फे ही भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे, ॲानलाईन परीक्षा घेणे, निकाल देऊन पदस्थापना देण्याची कार्यवाही हे मंडळ करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही परीक्षा मात्र आयबीपीएस या कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान आता या कंपनीने एप्लीकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच ही पदभरती होणार असल्याचे चित्र आहे. आता आपण नेमक्या कोणत्या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….

एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या पदभरतीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका महिला, विस्तार अधिकारी कृषी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी इत्यादी १८ संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. निश्चितच ही पदभरती इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस