12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Recruitment 2023 : बीएसएफ मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बीएसएफ ने नुकतीच रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

म्हणून ज्या तरुणांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थातच सीमा सुरक्षा दलात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी राहणार आहे.

बीएसएफ ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, BSF मध्ये विविध पदाच्या रिक्त 247 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 21 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- CBSE 12वी चे निकाल लागले; महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12वीचे निकाल केव्हा? पहा डिटेल्स

वास्तविक या पदभरतीसाठी अर्ज करण्यासं 12 मे 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता यामध्ये जवळपास नऊ दिवसांची वाढ करण्यात आली असून आता 21 मे 2023 ही शेवटची मुदत राहणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती?

बीएसएफ ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक्स या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागांचा तपशील

यामध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर या पदाच्या 217 जागा भरल्या जाणार आहेत तर हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदाच्या उर्वरित म्हणजेच 30 जागा भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये सरकारने किती व्याज जमा केले? PF ची एकूण रक्कम किती? आता इंटरनेटशिवाय पाहता येणार, पहा संपूर्ण प्रोसेस

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा 

या पदासाठी सायन्स फॅकल्टी मधून फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या तीन विषयांसह किमान 60 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण झालेला उमेदवार पात्र राहणार आहे. तसेच बारावीनंतर आयटीआय केलेले उमेदवार देखील यासाठी पात्र राहणार आहेत.

पण शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवारांनी एकदा अधिसूचना अर्थातच जाहिरात वाचणे जरुरीचे आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 18 ते 25 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे.

किती पगार मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 या दरम्यान वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा?

https://rectt.bsf.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज 21 मे 2023 पूर्वी सादर करू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….