Chana Procurement : ‘या’ दिवशी प्रत्यक्षात सुरू होणार नाफेडची हरभरा खरेदी; खरेदी पूर्व नोंदणी करण्यासाठी तारीखही जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chana Procurement : महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाची काढणी सुरू झाली आहे. काही जिल्ह्यात हरभरा काढणी पूर्ण झाली असून शेतकरी बांधव हरभरा विक्रीसाठी लगबग करत आहेत. मात्र बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड मार्फत हरभऱ्याची हमीभावात खरेदी केली जावी अशी मागणी केली जात होती.

अशातच आता हरभरा उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हरभरा खरेदीसाठी नाफेडमार्फत 14 मार्चपासून सुरुवात होणार असून विक्रीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 27 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून 15 मार्चपर्यंत ही सुरूच राहील अशी माहिती समोर आली आहे. यामुळे प्रत्यक्षात हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान हमीभावात आपला माल विकता येणार आहे.

शिवाय याचा परिणाम म्हणून खुल्या बाजारातही हरभरा दर वाढू शकतात असं मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे निश्चितच संकटात सापडलेल्या हरभरा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की केंद्र शासनाने नुकतेच रब्बी हंगाम 2022 23 साठी किमान हमीभावात हरभरा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. यंदाच्या हंगामात नाफेडच्या माध्यमातून जवळपास आठ लाख दहा हजार टन हरभरा खरेदी केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा निहाय हरभरा उत्पादकता देखील जाहीर झाली आहे. यामुळे आता हरभरा उत्पादकतेनुसारच हरभऱ्याची नाफेड मार्फत खरेदी होणार आहे. म्हणजेच यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपला शेतमाल हरभरा खरेदी केंद्रावर विक्री करता येणे शक्य बनणार आहे. यामुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हंगामात आठ राज्यस्तरीय संस्थांच्या माध्यमातून हमीभावात हरभऱ्याची खरेदी होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाफार्मस प्रोड्युसर कंपनी लि. पुणे, पृथ्वाशक्ती एफपीसी, अहमदनगर, वॅपको, नागपूर, महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि. अहमदनगर, महाकिसान वृद्धी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नाशिक व महास्वराज्य फार्मर्स प्रोड्युसर कंपनी फेडरेशन देवळा, नाशिक या आठ संस्थांचा समावेश राहणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासूनची नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केली जावी ही शेतकऱ्यांची मागणी शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून यामुळे हरभरा दरात बळकटी येणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.