ब्रेकिंग! केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Increase : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काल मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय काल केंद्र शासनाने घेतला. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.

निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज ठरली आहे. दरम्यान आता केंद्र पाठोपाठ राज्य शासनाकडून देखील महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जात आहे. राजस्थान राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथील राज्य कर्मचाऱ्यांना देखील आता 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

हे पण वाचा :- जनार्दनराव मानलं! संकटातून मार्ग काढत दुष्काळी पट्ट्यात फुलवली शेती; कलिंगड अन मिरचीच्या पिकातून झाली लाखोंची कमाई

महागाई भत्ता वाढीचा लाभ हा जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी किंवा डीए फरकाची रक्कम देखील त्यांना मिळणार आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून देखील लवकरच महागाई भत्तामध्ये वाढ करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता वाढीचा लाभ हा कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा दिला जातो. जानेवारी महिन्यात आणि जून महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. दरम्यान आता जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाला असून राजस्थान सरकारने देखील वाढीचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचे संकट अजून गेले नाही; आता ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा इशारा

केंद्राच्या निर्णयानंतर लगेचच राजस्थान सरकारने घेतलेला निर्णय तेथील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा असून सरकारच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे. वास्तविक केंद्र शासनाने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर लगेचच राज्य शासनाने देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ देणे अपेक्षित असते.

मात्र अनेकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ देताना राज्य शासनाकडून दिरंगाई केली जाते. यामुळे आता महाराष्ट्र राज्य शासनाकडून महागाई भत्ता वाढ केव्हा लागू होते, याकडे राज्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. काही जाणकार लोकांनी मात्र लवकरच राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ दिली जाऊ शकते असा दावा केला जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; महाराष्ट्रात यंदा उष्णतेची लाट, महापुर आणि दुष्काळ पडणार, आता ‘या’…