मोठी बातमी ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; नवीन योजनेत आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून शासनाविरोधात रोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 मिळणार आहेत.

यासोबतच मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना मागेल त्याला ठिबक सिंचन, फ़ळबाग, अस्तरीकरण, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर यांसारख्या बाबी उपलब्ध करून दिल्या जाणार असून यासाठी 1000 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती काल अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

यासोबतच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. खरं पाहता ही अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत अपघात झालेल्या शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये दिले जात होते तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना 2 लाख दिले जात होते.

मात्र आता या रकमेत वाढ झाली आहे आणि योजनेचे स्वरूप देखील बदलण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे रूपांतर आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनामध्ये करण्यात आले आहे.

तसेच पूर्वी ही योजना कंपन्यांच्या माध्यमातून राबवली जात होती. म्हणजेच कंपन्यांच्या माध्यमातून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम उपलब्ध होत होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करत ही योजना थेट राज्य शासनाकडून राबवली जाणार आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल अशी अशा व्यक्त होत आहे.

यासोबतच विमा रकमेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपयाची मदत या योजनेच्या माध्यमातून होत मात्र आता दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातूनच ही मदत मिळेल यामुळे शेतकऱ्यांचा नाहक होणारा त्रास वाचेल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे.