Animal Fodder : ‘हा’ विशेष प्रकारचा चारा गाई आणि म्हशींना खाऊ घाला आणि वाढवा दुधाचे प्रमाण! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Fodder :- शेतकरी शेती सोबत पशुपालन करून मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या आर्थिक उत्पन्न सध्या वाढवत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता पशुपालन व्यवसाय केला जात आहे.

पशुपालन व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना गाई व म्हशींपासून जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळावे याकरिता पशुपालक शेतकरी प्रयत्न करत असतात व त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करतात.

यामध्ये दुधाचे उत्पादन वाढावे याकरिता जनावरांचे चारा व्यवस्थापन या गोष्टीला खूप महत्त्व असते. चारा व्यवस्थापन उत्तम असेल तर त्याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावर सकारात्मक पद्धतीने होतो. म्हणून आपण या लेखामध्ये एका विशेष चारा पिकाची माहिती घेणार आहोत जे जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त असे मानले जाते व जनावरांकरिता स्वस्तामध्ये चाऱ्याची व्यवस्था देखील होते.

आफ्रिकन टॉल आहे चाऱ्याचा सर्वात उत्तम वाण

जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या अनेक जाती आहेत. परंतु त्यापैकी आफ्रिकन टॉल हा चाऱ्याचा वाण उत्कृष्ट मानला जातो. हा एक मक्याच्या जातीचा चारा असून इतर सामान्य प्रकारच्या चाऱ्याच्या तुलनेमध्ये दुप्पट उत्पादन मिळते. या चाऱ्याच्या माध्यमातून शेतकरी कमीत कमी खर्चात जनावरांसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतात.

आफ्रिकन टॉल या चाराच्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याची कांडी लांब, जाड आणि मजबूत असते व वादळ जरी आले तरी जमिनीला आडवे न होता उभा राहतो व नुकसान होत नाही. तसेच खायला हा गोड आणि रसाळ असल्यामुळे जनावरे देखील आवडीने खातात. आफ्रिकन टॉल या चाऱ्याच्या वाणाची उगवण क्षमता उत्तम असते व पाने देखील लांब व रुंद असतात. त्यामुळे साहजिकच जास्त चाराचे उत्पादन मिळते.

आफ्रिकन टॉल या चाराच्या वाणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

1- आफ्रिकन टॉल हा चाऱ्याचा वाण उंच वाढतो तसेच खायला गोड आणि रसाळ असतो. त्यामुळे जनावरे आवडीने खातात.

2- तसेच हे चारा पीक दहा फुटांपेक्षा जास्त उंच वाढते.

3- या जातीचा चारा जनावरांना हिरवा चारा म्हणून आणि सायलेज बनवण्यासाठी देखील वापरला जातो.

4- या चाऱ्याचे उत्पादन इतर प्रकारच्या चाऱ्याच्या तुलनेमध्ये जास्त मिळते.

5- कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चाऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते.

6- हा आफ्रिकन टॉल चाऱ्याचे बिगर सिंचन क्षेत्रामध्ये 30 ते 40 टन आणि पाण्याची सोय असेल तर 50 ते 60 टन इतकी उत्पादन मिळते.

लागवडीसाठी आवश्यक गोष्टी

या चारा पिकाची लागवड वालुकामय, चिकन माती असलेल्या जमिनीत देखील केली जाते. लागवड करण्याअगोदर जमिनीची नांगरणी करून जमीन बारीक व व्यवस्थित सपाट करून घ्यावी. लागवडीकरिता या वाणाचे एकरी 25 ते 30 किलो बियाणे पुरेसे ठरते.

तसेच याची लागवड 15 फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत करता येते. लागवड करताना दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि रोपातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावे. एका हेक्टर मध्ये जर लागवड करायची असेल तर साधारणपणे सव्वा लाख रोपांची लागवड केली जाऊ शकते.