जगातील ‘या’ देशांमध्ये भारतीयांना कामासाठी जाणे आहे सोपे! सहजपणे मिळतो या देशांचा वर्क व्हिसा, वाचा देशांची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनेक भारतीय नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये वास्तव्याला आहेत. यामध्ये जगातील प्रमुख असे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा समावेश होतो. आपल्याला माहित आहे की, दुसऱ्या देशामध्ये जायचे राहिले म्हणजे आपल्याकडे पासपोर्ट आणि  व्हिसा असणे गरजेचे असते.

याकरिता प्रत्येक देशांची एक निश्चित अशी प्रक्रिया असते. ज्याप्रमाणे आपल्याला विदेशामध्ये प्रवास करायचा असेल तर व्हिसा आवश्यक असतो.अगदी त्याचप्रमाणे विदेशामध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर त्याकरिता वर्क व्हीसा गरजेचं असतो.

अशा प्रकारचा हिसा मिळवणे हे खूप गुंतागुंतीचे काम असते. परंतु जगातील काही देश असे आहेत की त्या देशांमध्ये काम करण्यासाठी जायचे असेल तर त्या ठिकाणचा वर्क व्हिसा भारतीयांना अगदी सहजपणे उपलब्ध होतो. ते देश नेमके कोणते आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 या देशांमध्ये भारतीयांना मिळतो सहजतेने वर्क व्हिसा

1- सिंगापूर सिंगापूर या ठिकाणी भारतीयांना वर्क व्हिसा अगदी सहजपणे मिळतो. सिंगापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान तसेच शिक्षण आणि आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी इत्यादी उद्योगांमध्ये भारतीय नागरिकांना खूप मोठी संधी आहे.

तसेच सिंगापूर हे प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्यामुळे व त्या ठिकाणाचे अनुकूल वातावरण अनेकांना कामाकरिता त्या ठिकाणी आकर्षित करते.

2- न्युझीलँड न्युझीलँड मध्ये देखील भारतीय नागरिकांना सहजपणे वर्क व्हिजा मिळतो. या ठिकाणी इच्छुक असलेल्या भारतीय व्यावसायिकांना अनुकूल अशा प्रकारचा वर्क व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून

या ठिकाणचे उच्च राहणीमान तसेच कामाच्या बाबतीत असलेले सकारात्मक वातावरण अनेकांना आकर्षित करते. न्यूझीलंड या ठिकाणी तुमच्या करिअरची प्रगती आणि व्यावसायिक वाढीसाठी खूप मोठी मदत होऊ शकते.

3- लंडन लंडन या ठिकाणी भारतीय नागरिकांना कामाच्या विविध संधी उपलब्ध असून जे कुशल व्यावसायिक आहेत त्यांच्याकरिता ग्लोबल टॅलेंट व्हिसा आणि स्किल्ड वर्कर व्हिसा इत्यादी विविध प्रकारचा व्हिसा या ठिकाणी मिळू शकतात. लंडनची मजबूत असलेली अर्थव्यवस्था करिअरमध्ये भरभराट आणण्यासाठी मदत करू शकते.

4- नेदरलँड या ठिकाणी देखील भारतीयांना वर्क व्हीसा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. या ठिकाणी करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत तसेच या ठिकाणचे उच्च राहणीमान तसेच करिअरच्या विविध संधी व आरोग्यसेवा अशा अनेक सेवांचा लाभ या ठिकाणी घेता येऊ शकतो.