सोने 44 हजारांवर ; पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा किती आहे भाव ? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- रुपयाच्या घसरणीदरम्यान बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे व चांदीच्या भावात तेजी नोंदली गेली. सोन्याच्या दरात दहा ग्रॅमची किंमत 112 रुपयांनी वाढली तर चांदीचा दर 126 रुपये प्रतिकिलो वाढला . वाढीनंतर आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 44174 रुपये आणि चांदीचा भाव 66236 रुपयांवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरावर दबाव आहे. पाकिस्तानमध्ये सोन्याचे भाव काय आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जिओ न्यूजच्या अहवालानुसार तेथे बुधवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 3000 रुपये होती.

1 तोळा म्हणजे 11.66 ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 88305 रुपये आणि 22 कॅरेट 80947 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करीत आहेत. चांदी प्रति तोळा 1320 आणि 1131 रुपये प्रति 10 ग्राम होती.

एमसीएक्सवर सोने आणि चांदीची किंमत –

देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरावर दबाव आहे. एमसीएक्सवर सायंकाळी 4.25 वाजता एप्रिल डिलीव्हरीचे सोने 137 रुपयांनी घसरून 44720 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि जून डिलिवरीचे सोन्याचे भाव 104 रुपयांनी घसरून 45004 रुपयांवर होते.

त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठी चांदी 589 रुपयांनी घसरून 66891 रुपयांवर आणि जुलै डिलिवरीसाठी चांदी 491 रुपयांनी घसरून ती 67975 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर