मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! ‘या’ बहू प्रतिष्ठित महामार्गाच्या बांधकामाला दिली मंजुरी; ‘त्या’ एका कारणामुळे काम रखडलं होत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : मुंबई हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बहुचर्चित महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने मुंबई वडोदरा महामार्गाबाबत मोठा आदेश जारी केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की त्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली मुंबई महामार्गाचा एक मुख्य टप्पा म्हणजेच मुंबई वडोदरा महामार्ग.

हा महामार्ग खरं पाहता खारफुटी असलेल्या अभयारण्यातून जातो. अशा परिस्थितीत, मुंबई वडोदराच्या बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला काही खारफुटी तोडाव्या लागणार आहेत. यामुळे या मार्गाचा बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 350 खारफुटी तोडण्यासाठी परवानगीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान आता या याचिकेवर मुंबई हायकोर्टाकडून सुनावणी घेत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूर वाला आणि न्यायमूर्ती संजय मारणे यांच्या खंडपीठाने या खारफटीतून तोडण्यासाठी एन एच आय ला परवानगी दिली आहे. यामुळे या महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजधानी दिल्ली ते राजधानी मुंबई या दरम्यान द्रुतगती महामार्ग केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आला आहे.

मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे चा मुंबई वडोदरा हा एक महत्वाचा टप्पा आहे. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि दमण, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत या मार्गाचे महत्त्व ध्यानात घेऊन मुंबई हायकोर्टाकडून खारफुटी तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2018 मध्ये मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा असा आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशाच्या माध्यमातून खारफुटी तोडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गासाठी खारफुटी तोडण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते. याच अनुषंगाने NHI कडून परवानगीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता मुंबई हायकोर्टाने यावर सुनावणी घेत खारफुटी तोडण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान खारफुटी तोडल्या जात असल्या तरी देखील यामध्ये काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. खारफुटी तोडल्या जातील मात्र महामार्गालगत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील केली जाणार आहे. एकंदरीत या निर्णयामुळे आता मुंबई वडोदरा महामार्गाच्या बांधकामाला गती लाभणार आहे.

पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावात लवकरच होणार भु-संपादन