आनंदाची बातमी ! मुंबईमधल्या ‘या’ अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, केलं जाणार ‘हे’ महत्वाचं काम, असा होणार प्रवाशांचा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway Station Work : मुंबई शहर आणि उपनगरात सध्या रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अमृतभारत योजनेचा देखील मोठा हातभार लागणार आहे.

अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे. याची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये करण्यात आली आहे. आता या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून या योजनेअंतर्गत मुंबईमधील एक अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्थानक विकसित होणार आहे.

हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प यावर्षी होणार पूर्ण, आता Thane – Borivali प्रवास होणार 15 मिनिटात, पहा…..

कुर्ला या राजधानी मुंबईतल्या वरदळीच्या रेल्वे स्थानकाचा विकास या योजनेअंतर्गत करण्याचे नियोजन आहे. यामुळे या रेल्वेस्थानकाला नवीन रूप मिळणार आहे. रेल्वे स्टेशनवर वेगवेगळी विकासाची कामे केली जाणार आहेत ज्यामुळे रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असून प्रवाशांसाठी देखील अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान आज आपण कुर्ला रेल्वे स्टेशन मध्ये काय-काय कामे केली जाणार आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

अमृत भारत योजनेअंतर्गत कुर्ला रेल्वे स्टेशन मध्ये

कोण-कोणती कामे होणार?

  • वाहतूक परिसंचरण सुधारणे आणि कार्यरत क्षेत्राचे सुशोभीकरण करणे 
  • रेल्वे स्टेशनच्या प्रवेश मार्गाचा विकास केला जाईल
  • उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म, कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म विकसित होतील.
  • उंचीमध्ये सुधारणा होणार आहे. 
  • अंतर्गत सजावट, प्रतीक्षालय इ. मध्ये सुधारणा.
  • शौचालयांचे अपग्रेडेशन होणार आहे. 
  • चांगल्या दर्जाच्या टिकाऊ फर्निचरची तरतूद केलेली आहे. 
  • उतारासह 12 मीटर रुंद सेंट्रल फूट ओव्हर ब्रिज विकसित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकंदरीत, अमृतभारत योजनेअंतर्गत मुंबईमधील तसेच विदर्भातील मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागातील महत्त्वाची रेल्वे स्थानके सुशोभित केली जाणार आहेत. एवढेच नाही तर त्या ठिकाणी प्रवाशांच्या दृष्टीने काही विकासकामे केली जाणार आहेत. म्हणजे रेल्वे स्थानकावर अति महत्त्वाच्या सुविधा अपग्रेड करण्याचे नियोजन आहे. 

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….