तरुणांसाठी आनंदाची बातमी ! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती; तुम्ही आहात का पात्र? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Recruitment 2023 : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी तर ही एक आनंदाचीच पर्वनी आहे.

कारण की, नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेत नुकतीच काही रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची असेल अशा तरुणांना ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

दरम्यान, आज आपण नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे? किती पदांसाठी भरती होणार आहे? यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय राहतील? अर्ज कसा करावा लागेल? अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय असेल? या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस ! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा होणार यशस्वी

कोणत्या पदासाठी होणार भरती?

इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर ची रिक्त पदे या पदभरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

इलेक्ट्रिकलची 120 पदे, मेकॅनिकलची 120 पदे आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशनची 60 पदे अशी एकूण 300 पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

आवश्यक शिक्षण

या पदासाठी पदानुसार किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशनमध्ये B.Tech केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. पण शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे जरुरीचे आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी कमाल 35 वर्षे वयापर्यंतचे उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्थातच 35 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या पदांसाठी पात्र राहणार नाहीत. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्थातच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सूट दिली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत मिळून जाईल.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय ! जमीन NA करण्यासाठी आता महसूल विभागाकडे जाण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीने जमिनी होणार NA, वाचा याविषयी सविस्तर

पदासाठी निवड कशी होणार?

या पदासाठी तीन टप्प्यात निवड होणार आहे. ऑनलाईन चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अर्ज कसा करावा लागणार

https://careers.ntpc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

या पदासाठी 19 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून 2023 पर्यंत इच्छुक व्यक्तींना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…