आता उरले फक्त 9 दिवस! 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ कामे, नाहीतर निर्माण होतील समस्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : मार्च महिना सुरू असून हा मार्च महिन्याचा जवळपास शेवटचा आठवडा आहे. 31 मार्च रोजी हे आर्थिक वर्ष संपणार आहे. आपल्याला माहित आहेच की, आर्थिक वर्ष संपायच्या अगोदर दरवर्षी अनेक महत्त्वाची कामे आपल्याला पूर्ण करणे गरजेचे असते.

यावर्षी देखील हे आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर म्हणजेच 31 मार्च नंतर काही महत्त्वाची कामे करण्याची मुदत संपणार असल्यामुळे त्यानंतर काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. 31 मार्चपूर्वी महत्वाची कामे पूर्ण करून घेणे खूप गरजेचे आहे. नेमके 31 मार्च पूर्वी कोणती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती आपण बघू.

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ही कामे

1- आयकर बचत संदर्भातील निर्णय- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स बचती संदर्भात तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला ते 31 मार्चच्या अगोदर घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला करात बचत करण्यासाठी काही पर्यायांची निवड करायची असेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. कर सूट मिळवण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 31 मार्च 2024 मध्ये करू शकता. परंतु जर कर सूट ज्या योजनांमधून मिळेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक जर तुम्ही 31 मार्च नंतर केली तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.

2- फास्टटॅग केवायसी पूर्ण करावी- फास्टटॅग ग्राहकांनी केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. जर अजून पर्यंत फास्टटॅग केवायसी पूर्ण केली नसेल तर ती 31 मार्च पर्यंत करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमचा फास्ट टॅग ब्लॅकलिस्टेड होऊ शकतो.

3- एसबीआय अमृत कलश योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर- स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही ठेविदारांसाठी एक फायदा मिळवून देणारी योजना असून या योजनेमध्ये ठेवलेल्या ठेवीवर 7.10 टक्के इतका व्याजदर मिळतो. तर या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के इतका परतावा मिळतो. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 मार्च च्या आतच घेता येणार आहे. कारण या योजनेची मुदत 31 मार्च 2024 पर्यंतच आहे.

4- आधार अपडेट करा- युआयडीएच्या माध्यमातून मोफत आधार कार्ड अपडेट अगदी घरबसल्या देखील करू शकतात. जर तुम्ही आधार केंद्रावर गेले तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे तुम्हाला जर मोफत घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही ते 31 मार्चपूर्वी करू शकतात.

5- एसबीआय WeCare विशेष ठेव योजनेत गुंतवणूक- तुम्हाला जर स्टेट बँकेच्या WeCare विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. ही एसबीआयची महत्त्वाची गुंतवणूक योजना असून या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी जर पाच ते दहा वर्षाच्या कालावधी करिता गुंतवणूक केली तर उत्तम परतावा मिळतो. त्यामुळे या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.