पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेबाबत मोठं अपडेट ; ‘या’ दिवशी सुरू होणार प्रत्यक्ष भूसंपादन, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Aurangabad Expressway : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड चे काम हाती घेतले आहे. या रिंग रोड मुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी क्षेत्राला उद्योगाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे.

या पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दीड हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. विशेष बाब अशी की या भूसंपादन प्रक्रियेसाठी एक स्वातंत्र्य कक्ष उभारला गेला आहे. यामुळे भूसंपादनाच्या कामाला गती लाभणार असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान या प्रकल्पाबाबत अधिक माहिती अशी की, भूसंपादनासाठी आवश्यक जमीन मूल्यांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यासोबतच पुणे बेंगलोर आणि पुणे औरंगाबाद या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचं देखील काम हाती घेण्यात आलं आहे.

खरं पाहता या दोन महामार्गांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. विशेष बाब अशी की, यासाठी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या सल्लागार कंपन्यांनी महामार्गाचे लेआउट म्हणजेच आरेखनाचे काम प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण केले आहे. तसेच प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी देखील या कंपन्यांकडून काम सुरू आहे.

विशेष बाब अशी की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे औरंगाबाद आणि पुणे बेंगलोर या महामार्गांसाठी आवश्यक जमीन भूसंपादनाची जबाबदारी देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या खांद्यावर आली आहे. म्हणजेच पुणे रिंगरोड, पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर या तीन महामार्गांसाठी साडेसहा हजार हेक्टर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून संपादित केली जाणार आहे.

विशेष म्हणजे यासाठी एक स्वातंत्र्य कक्ष विधानभवनात स्थापन करण्यात आला आहे. निश्चितच या महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली असून लवकरच जमिनीचे संपादन पूर्ण करून या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचं प्राधिकरणच्या माध्यमातून ठरवण्यात आल आहे.

पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा मुहूर्त ठरला ; असे राहतील हे मार्ग, पहा सविस्तर