पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Farmer Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण जोपासला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरीही मागे राहिलेले नाहीत. जिल्ह्याला मोठं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असून शेती क्षेत्रात जिल्ह्याने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे.

येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत लाखों रुपयांची कमाई करून राज्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्ग दाखवण्याचे काम केले आहे. आंबेगाव तालुक्यातील मौजे नागापूर येथे देखील असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर आला आहे. नागापूर येथील देवदत्त निकम हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. सोबतच ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही काम पाहत आहेत.

निकम यांनी आपल्या अकरा एकर जमिनीत द्राक्षाची शेती करून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक काम केला आहे. वास्तविक निकम यांची जमीन ही खडकाळ माळरानावरील. मात्र मनात काहीतरी हटके करण्याची उमेद, या अनुषंगाने कष्ट घेण्याची तयारी त्यामुळे त्यांनी 11 एकर खडकाळ माळरानावर द्राक्षाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही; पण OPS मधील ‘या’ तरतुदी लागू केल्या जातील, पहा….

निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अकरा एकरात द्राक्षाची लागवड केली. दोन वर्षे या बागेची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी जोपासना केली. या बागेत दिवस-रात्र आपल्या परिवारांसमवेत त्यांनी कष्ट घेतले, परिणामी आता या बागेतून त्यांना चांगली विक्रमी उत्पादन मिळत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी लावलेल्या द्राक्षांना चीन व श्रीलंकेत मोठी मागणी आहे.

यामुळे त्यांना या बागेतून चांगली कमाई होण्याची आशा आहे. खरं पाहता द्राक्ष शेती मोठी खर्चिक आहे. यासाठी खर्च खूप अधिक करावा लागतो. निकम यांनी देखील या द्राक्ष बागेच्या उभारणीसाठी तब्बल एकरी दहा लाखांपर्यंतचा खर्च केला आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी एकरी तीन लाख रुपये एवढा खर्च त्यांना आला आहे.

त्यांच्या बागेत पाणी व्यवस्थापनासाठी तसेच विद्राव्य खताच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन या बागेतून मिळणार आहे. या बागेने जवळपास 40 ते 50 मजुरांना हाताला काम दिले आहे. दरम्यान आता या बागेतून त्यांना जवळपास 70 ते 75 लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे.

हे पण वाचा :- उच्चशिक्षित तरुणांचा शेतीमध्ये हटके प्रयोग! कलिंगड अन खरबूज पिकाच्या शेतीतून मात्र 70 दिवसात मिळवले लाखोंचे उत्पन्न, पहा…..

जवळपास 30 ते 35 लाखाचा खर्च काढून एवढी कमाई त्यांना होणार आहे. म्हणजेच एकरी सात लाखांपर्यंतची कमाई त्यांना होणार आहे. खडकाळ जमिनीवर केलेला हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय असून त्यांची बाग पाहण्यासाठी राज्यभरातून द्राक्ष उत्पादक कायमच त्यांच्या बांधावर हजेरी लावत असतात. द्राक्ष शेतीतून त्यांना लाखोंची कमाई होत आहे ते तर त्यांच्या कष्टाचे फलित म्हणावे लागेल.

पण यासोबतच त्यांनी माणूसपण देखील अबाधित राखल आहे. आपल्या शेतात दाखल होणाऱ्या मजुरांना ते अगदी घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक देतात. कोणी भुकेपोटी काम करणार नाही याची खात्री करतात. यामुळे मजुरांना देखील त्यांच्याकडे काम करणे अधिक प्रिय असून यामुळे त्यांना कधीच मजूर टंचाई भासत नाही.

शिवाय त्यांचा संपूर्ण परिवार शेतीत राबवतो. एक आणखी विशेष गोष्ट म्हणजे निकम यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची शेती आता केली जाऊ लागली आहे. यामुळे आंबेगाव तालुक्यातील या परिसराच चित्र पालटलं आहे. निश्चितच निकम यांनी केलेला हा प्रयोग इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्ग दाखवणारा राहील यात तीळमात्र देखील शंका नाही.

हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ‘या’ मोबाईल नंबरवर संपर्क साधा, पोलीस प्रशासनाचे आवाहन