गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कसे होता येते? त्याकरिता परवाना लागतो का? काय आहे प्रोसेस? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची प्रकल्पांची कामे किंवा रस्त्यांची, छोटी मोठी बंधारे, गावांमधील पाण्याच्या टाक्या व इतर अनेक प्रकारची छोटी मोठी कामे केली जातात. परंतु आपल्याला माहित असेलच की, अशा कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातात  व त्या माध्यमातून एखाद्या ठेकेदाराला किंवा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरला ही कामे दिली जातात. परंतु यामध्ये देखील एक मोठी प्रक्रिया असते व तेव्हाच काम हे ठेकेदाराला मिळत असते.

आपण रस्त्यांच्या कामाचे ठेकेदार किंवा इतर सरकारी कामे करणारे ठेकेदार पाहतो परंतु  नेमके ठेकेदार किंवा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर कसे होता येते? किंवा सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीची कामे कोणत्या ठेकेदाराला दिली जातात? इत्यादी बद्दल माहिती असणे देखील तितकेच गरजेचे असते. ठेकेदार किंवा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होणे पाहिजे तेवढे सोपे नाही. याकरिताची देखील एक  प्रक्रिया असून त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार होता येते. नेमकी याबद्दलची सगळी माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 ठेकेदार कसे व्हावे?

रस्ता कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार व्हायला देखील तुम्हाला काही गोष्टी शिकण्याची गरज असते म्हणजेच तुम्हाला अभ्यास हा करावाच लागतो. समजा तुम्हाला जर रस्ता कॉन्ट्रॅक्टर व्हायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला सिविल इंजिनिअरिंग पास आऊट करणे गरजेचे आहे व कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी देखील तुम्हाला डिप्लोमा करावा लागतो.

यानंतर लगेच तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार होतात असे नव्हे. हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रातील अनुभव यावा याकरिता कुठल्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर सोबत काही वर्ष काम करावे लागते. कारण सरकारच्या माध्यमातून रस्ता बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट हे अशा लोकांना दिले जाते की ज्यांना या कामांमध्ये कमाल अनुभव आहे.

 रस्ता बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडून दिले जाते?

रस्ता बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे आपापल्या स्तरावर जारी करत असतात. अशी कामे मिळवण्यासाठी जवळपास बरेच कॉन्ट्रॅक्टर अर्ज करतात व त्यातील फक्त एकालाच ते काम दिले जाते. याकरिता सरकारी संस्थांच्या माध्यमातून निविदा काढल्या जातात व ज्या कंत्राटदाराला याचा अनुभव आहे व त्याची पात्रता काय आहे या सगळ्या आधारावर  काम दिले जाते.

 कॉन्ट्रॅक्टर परवाना साठी कुठली कागदपत्रे लागतात?

कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्हाला परवान्याची आवश्यकता असते व तो परवाना करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागतात. कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक व सर्वप्रथम तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र किंवा केलेल्या डिप्लोमाचे कागदपत्रांच्या प्रती असणे आवश्यक आहे.

तसेच तुम्हाला काही दुसऱ्या राज्यांमध्ये रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील लागते. तुम्ही राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात.

 अशा पद्धतीने परवान्यासाठी नोंदणी करा?

ही सगळी कागदपत्रे घेऊन तुम्ही कंत्राटदार नोंदणी मंडळाकडे जाऊन रस्ता कंत्राट परवान्यासाठी नोंदणी करू शकतात. यामध्ये तुमचा अर्ज व कागदपत्रे योग्य असतील आणि तुम्ही जर यामध्ये पात्र असाल तर तुम्हाला एक ते दोन महिन्यात रस्ता कंत्राटदाराचा परवाना मिळतो.

तसेच तुम्ही या परवाण्याकरिता नॅशनल गव्हर्नमेंट सर्विसेस पोर्टलच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता. या पद्धतीने तुम्हाला रस्ता बांधणीचा परवाना मिळाला व तुम्हाला या कामाचा दांडगा अनुभव आहे तर तुम्हाला सरकारकडून रस्ते बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट अगदी सहजपणे मिळते.