32 हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत ‘या’ व्यावसायिक! पण संपत्तीला कोणी नॉमिनीच नाही, वाचा किरण मुजुमदार-शॉ यांची कहाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बरेच व्यक्ती हे नोकरी किंवा व्यवसायांच्या माध्यमातून खूप मोठी मालमत्ता उभी करतात किंवा संपत्ती मिळवतात व त्यांच्या उतार वयामध्ये त्या संपत्तीचे विभाजन ते त्यांच्या वारसदारांमध्ये करतात. साहजिकच असे संपत्तीचे विभाजन हे मुला मुलींमध्ये करण्याचा एकंदरीत ट्रेंड आहे. बरेच उद्योजकांचा जरी विचार केला तरी असे उद्योजकांनी आता त्यांच्या घरातील मुला किंवा मुलींना आता उद्योग व्यवसायात सामावून घेऊन येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी सोपवली जाईल अशा पद्धतीचे तयारी देखील केलेली आहे.

यामध्ये आपल्याला मुकेश अंबानी यांचे नाव घेता येईल.  साहजिकच ही प्रक्रिया सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा बडा उद्योगपती यांच्यामध्ये पार पाडली जाते व वारसदारांकडे संपत्तीचे हस्तांतरण केले जाते किंवा उत्तराधिकारी म्हणून उद्योग व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी मुला मुलींकडे जाते.

परंतु जर आपण काही व्यवसायिकांचा किंवा व्यवसायांचा विचार केला तर त्यांच्यावर उत्तराधिकारी संबंधी काही अडचणी आलेल्या असून आता या व्यवसायांची जबाबदारी घेणारी पुढील पिढी कोण असणार? हा एक मोठा प्रश्न आहे व अशीच स्थिती ही बायोकॉनच्या बाबतीत देखील दिसून येत आहे.

 बायोकॉनच्या बाबतीत काय आहे स्थिती?

भारतामध्ये अनेक उद्योगपती आहेत परंतु यामध्ये काही महिला उद्योजक आहेत. या आघाडीच्या महिला उद्योजकांचा विचार केला तर यामध्ये किरण मुजुमदार शॉ हे प्रसिद्ध नाव असून त्यांनी 45 वर्षांपूर्वी बायोकॉन ही कंपनी सुरू केली होती व तिचे मूल्य आज 32 हजार कोटीच्या घरात आहे.

परंतु त्यांचा हा कोट्यावधी रुपयांचा उद्योग व्यवसाय आता त्यांच्यानंतर कोण सांभाळणार याबाबत मोठी चर्चा असून वय वर्ष 70 असलेल्या किरण मुजुमदार शॉ यांच्या कंपनीचे मूल्य तब्बल 32 हजार कोटी रुपये आहे. परंतु एवढ्या मोठ्या संपत्तीच्या उत्तराधिकारी म्हणून आता कुणाच्या हातात धुरा जाणार  याबाबत खूप मोठा प्रश्न आहे. कारण किरण मुजुमदार शॉ यांना मुलगा नसल्यामुळे आणि गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले व अशा परिस्थितीमध्ये आता त्यांच्यानंतर बायोकॉन चा प्रमुख कोण असेल हा एक मोठा प्रश्न आहे.

स्वतः किरण मुजुमदार  शॉ यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टता केलेली नाही. त्या एक यशस्वी उद्योजक असून बेंगलोर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कंपनीचे मूल्य तब्बल 32 हजार कोटी रुपये आहे.त्यांच्या बायोकॉन या कंपनीची सुरुवात पाहिली तर 1978 या साली त्यांनी दहा हजार रुपये गुंतवून बायोकॉन या कंपनीची सुरुवात केली होती. अनंत अडचणींचा सामना करून त्यांनी कंपनीची स्थापना केली व पुढे अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत त्यांनी बत्तीस हजार कोटीपर्यंत ही कंपनी यशस्वी केली.

त्यांचे असलेले प्रचंड प्रमाणातले व्यस्त जीवनामुळे त्यांना खासगी आयुष्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यांचे लग्न उजोन शॉ यांच्याशी झाले परंतु लग्नाला अनेक वर्ष उलटून देखील त्यांना अपत्य झाले नाही. गेल्याच वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. परंतु आता या पार्श्वभूमीवर किरण मुजुमदार शॉ यांचा नेमका उत्तराधिकारी कोण याबद्दल एक मोठा प्रश्न असून त्याबद्दल अजून देखील काही स्पष्टता नाही. परंतु एक शक्यता जर पाहिली तर कंपनीची जबाबदारी किरण या बायोकॉन व्यावसायिकांकडे देऊ शकतात किंवा टाटा यांच्याप्रमाणे ट्रस्ट बनवून कंपनीची जबाबदारी ट्रस्टला सोपवू शकतात असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.