Snake Information: सापाची कातडी रंगीत नसून ती सफेद आणि पारदर्शक का असते!घरात ठेवणे योग्य असते का? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Information:- जगात हजारो सापांच्या प्रजाती असून भारतात देखील अनेक विविध प्रकारच्या जाती आहेत. बहुतांशी सापांच्या जाती या  रंगीबेरंगी असतात व त्यांचे प्रकार देखील वेगळे असतात. यामध्ये बोटावर मोजण्या इतका जाती या विषारी आहेत व बऱ्याच जाती बिनविषारी वर्गात मोडतात.

जर आपण सापाच्या जातींचा विचार केला तर त्यांच्या जातीनुसार वेगवेगळे वैशिष्ट्य असते. अगदी तसेच सापाच्या कातडी बाबत म्हटले तर त्यामध्ये जास्त करून वेगळेपण दिसून येत नाही. सापाच्या कातडीचे एकच वैशिष्ट्य म्हणजे सापाचा रंग जरी वेगवेगळ्या प्रकारचा असला तरी देखील सापाचे कातडी मात्र सापासारखी रंगीबेरंगी नसून ती सफेद व पारदर्शक असते. त्यामुळे आपल्याला नक्कीच प्रश्न पडेल की सापाची कातडी सापासारखी रंगीबिरंगी का नसते?

सापाच्या कातडीविषयी विशेष माहिती

यामध्ये असे मानले जाते की सापाचे मूळ चमकदार रंग त्याच्या त्वचेमध्ये असतात आणि वरच्या बाजूची कातडी सहसा पारदर्शक असते. या कारणामुळे जेव्हा साप आपली कात किंवा कातडी टाकतो तेव्हा  सामान्यतः पारदर्शक किंवा पांढरा रंगाची असते. कधीकधी सापाच्या कातडीवर गडद तपकीर काळे पट्टे किंवा डाग देखील असतात.

जर आपण किंग कोब्रा जातीच्या सापाचा विचार केला तर तो वर्षातून पाच वेळा स्वतःची कातडी काढतो. साप किती वेळा त्वचा किंवा कातडी काढू शकतो हे त्याचे वय आणि जातीवर अवलंबून असते. जर तरुण साप असेल तर दोन आठवड्यांनी त्याची कातडी टाकू शकतो तर मोठे सहा वर्षातून दोनदाच असे करतात.

साप त्यांची कातडी का काढतात या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर कातडी त्यांच्याबरोबर वाढत नाही. म्हणजे साप जसा जसा वाढतो तस तशी त्याची कातडी त्याच्यासोबत वाढत नसल्याने त्याला ही कातडी टाकावी लागते. साप एका महिन्यातून एकदा त्याची कातडी टाकू शकतात परंतु वर्षातून काही वेळाच साप कातडी टाकतात. जंगलामध्ये साप असतील तर ते त्यांची कातडी आठवड्यातून एकदा ते दर तीन महिन्यांनी देखील टाकू शकतात. जर एखाद्याला सापाची कातडी पूर्ण दिसली तर ते भाग्यवान मानले जाते.

 सापाची कातडी टाकण्याचे काही महत्त्वाची कारणे

जेव्हा सापाच्या त्वचेला काही परजीवी चिकटून राहतात. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी साप जेव्हा कातडी टाकून देतो तेव्हा ते परजीवी त्याच्यासोबत निघून जातात. कारण साप हा सरपटणारा प्राणी असल्यामुळे असे परजीवी काढून टाकण्यास तो सक्षम नाही. म्हणून जुनी त्वचा काढून टाकणे त्याच्यासाठी आवश्यक आहे.

जंगलामध्ये साप त्याचे शरीर एखादा खडक किंवा झाडाच्या बुंध्यावर किंवा वनस्पतीच्या मजबूत देठावर घासतात व अशावेळी जेव्हा अशा वस्तूंच्या पृष्ठभागावर ते शरीर फिरवतात तेव्हा हळूहळू त्यांची त्वचा निघते. शेड वगैरे ठिकाणी जर सापाचे वास्तव्य असेल तर तो अशा ठिकाणचा वापर देखील कातडी काढण्यासाठी करू शकतो.

सापासाठी कातडी काढून टाकणे ही एक वेदनादायक प्रक्रिया असून या काळामध्ये त्याची भूक कमी होते व त्याला पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यावेळी सापाला कुठलीही वस्तू खाण्याबद्दल इच्छा राहत नाही. या कालावधीत साप खूप स्वस्त होतो. जेव्हा तो संपूर्णपणे त्वचा काढतो तेव्हाच तो पुन्हा खायला लागतो.

 सापाच्या कातडीचे उपयोग

बेल्ट तसेच शूज, हॅन्ड बॅग आणि पर्स यासारखे फॅशन ॲक्सेसरीज बनवण्याकरिता सापाच्या त्वचेचा वापर केला जातो.तसेच सापाची कातडी काही स्ट्रीन्ग वाद्य बनवण्यासाठी देखील केला जातो. सापाच्या कातडीपासून बनवलेले वस्तू या महाग असतात कारण त्या दुर्मिळ असतात.

तसेच काही महागडे आणि स्टायलिश टोप्या देखील सापाच्या कातडी पासून बनवल्या जातात. तसेच घरामध्ये सापाची कातडी ठेवल्याने धनाची कमतरता दूर होते असे देखील मानले जाते. याशिवाय घरामध्ये सापाची कातडी ठेवल्याने दुरात्म्यापासून आणि वाईट नजरांपासून देखील संरक्षण होते.