अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक कोंडीत ! पॉलिटिक्स ‘गुरुजीं’मुळे ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अकोले आणि पारनेर या तीन तालुक्यातील जवळपास 3 हजार शिक्षकांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आल आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांनी बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळातील गुरुजींकडूनच पगार बिले मुद्दामून उशिरा काढले जात असल्याचा आरोप केला आहे. खरं पाहता अहमदनगर मध्ये ऑक्टोबर महिन्यात शिक्षक बँकेची निवडणूक झाली.

यामध्ये पराभूत झालेल्या मंडळाकडून ज्या शिक्षकांनी मत टाकलेले नाही अशा शिक्षकाचे वेतन बिले जाणीवपूर्वक उशिरा काढले जात आहेत. असा आरोप जिल्ह्यातील शिक्षकांनी केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11000 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी श्रीगोंदा, अकोले आणि पारनेर या ठिकाणी कार्यरत असलेले तीन हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील पेमेंट अजून मिळालेले नाही. आता जानेवारी उजाडला तरी देखील नोव्हेंबरचे पेमेंट मिळालेले नसल्याने सदर कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

यामुळे शिक्षकांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर पासून वेतन हातात आले नसल्याने या तीन तालुक्यातील शिक्षक कुठे ना कुठे अडचणीत सापडले आहेतं. हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात साडेअकरा हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या महिन्याच्या वेतनासाठी 90 कोटींची मागणी जिल्हा परिषदेकडून होत असते.

मात्र शासन केवळ 70 किंवा 75 कोटी देते. अशा परिस्थितीत ज्या तालुक्यांची बिले सर्वात आधी वेतनासाठी हजर होतात त्यांना वेतन मंजूर केल जात. म्हणजे ज्या शिक्षकांची वेतन बिले वेळेवर जिल्हा परिषदकडे येत नाहीत त्या शिक्षकांचे वेतन निधी अभावी लांबत अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली गेली आहे. निश्चितच ‘ज्ञानदाना’चे काम करणाऱ्या गुरुजींना ‘मतदाना’मुळे आपलं ‘वेतनदान’ करण्याची वेळ आली आहे.

एकंदरीत शासनाकडून निधी कमी मिळत असल्याने काही शिक्षकांना पगार मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे तर शिक्षकांकडून राजकीय सुडापायी हा सर्व कार्यक्रम उभारला गेल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच कारण कुठलेही असो मात्र गुरुजींची पिळवणूक होत आहे यातं तीळमात्र देखील शँका नाही.