कौतुकास्पद ! पती निधनानंतर खचून न जाता शेती सांभाळली; सफरचंदाच्या लागवडीतून झाली लाखोंची कमाई, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : शेती हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत पुरुषांची मक्तेदारी स्त्रियांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. मात्र आता ही परिस्थिती हळूहळू बदलू पाहत आहे. स्त्रियांनी देखील आता या व्यवसायात आपले कसब दाखवले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात स्त्रियांनी उतरून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. दरम्यान आज आपण अशा एका ध्येयवेढ्या महिलेची शेतीमधील यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी पती निधनानंतर शेतीची सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेत यशस्वी शेती करून दाखवली आहे.

त्यांनी शेतीमध्ये केवळ वेगवेगळे प्रयोग केले नाहीत तर या प्रयोगाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देत त्यांना नोकरीला लावले आहे. यामुळे आता महिला देखील पुरुषांपेक्षा कमी नाहीत आणि सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा वरचढ आहेत हे सिद्ध झाले आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी सावंगी तालुक्यातील मौजे केळसावंगी येथील विजया घुले या महिला शेतकऱ्याने सफरचंद शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज; आजपासून ‘या’ भागात पडणार अवकाळी पाऊस !

सफरचंद म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते जम्मू काश्मीरच चित्र. जम्मू-काश्मीरमधील हवामान सफरचंद पिकासाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सफरचंद लागवड मोठ्या प्रमाणात होते. जम्मू काश्मीर व्यतिरिक्त हिमाचल प्रदेश मध्ये सर्वाधिक सफरचंद लागवड केली जाते. मात्र आता हे थंड हवामानातील पीक बीड जिल्ह्यासारख्या अतिउष्ण हवामानातं देखील येऊ शकते हे या महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

खरं पाहता विजया घुले यांचा शेतीमधला हा प्रवास विशेष खडतर होता. पती निधनानंतर त्यांच्या खांद्यावर संपूर्ण शेतीची आणि परिवाराची जबाबदारी आली. मात्र पति निधनाने खचून न जाता त्यांनी पारंपारिक शेतीमध्ये बदल करत आधुनिकतेची कास धरत शेती व्यवसाय सुरू केला. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण दिले आणि एका मुलाला इंजिनियर तर एका मुलाला शिक्षक बनवले. शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

सफरचंद शेती हा देखील अशाच एक प्रयोगाचा भाग होता. 2020 मध्ये त्यांनी सफरचंद लागवड केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेश मधून हरमन जातीच्या सफरचंदाची रोपे मागवली. एका एकरात 12 बाय 10 अंतरावर 240 रोपांची लागवड त्यांनी केली. यासाठी जवळपास 60,000 पर्यंतचा खर्च त्यांना आला असून आता यातून प्रत्यक्ष उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत पाच टन माल त्यांना यातून मिळाला असून एकूण 20 टन पर्यंत उत्पादन मिळेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे. म्हणजेच सफरचंद पिकातून त्यांना चार लाखापेक्षा अधिकची कमाई या ठिकाणी होणार आहे. निश्चितच शेती मधला हा बदल आणि नवखा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMD चा अंदाज