शेतकऱ्याच्या मुलाने घातली उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी! अफाट कष्ट आणि जिद्द आली कामाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनामध्ये जिद्द आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्मी असेल तर तुमची आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती कशीही राहू द्या त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्यक्तीवर होत नाही व तो अखंड ध्येय पूर्ण करण्याच्या आसक्तीने त्या दृष्टिकोनातून अपार कष्ट करतो व यश मिळवतो. तसे पाहायला गेले तर जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही कि ती माणसाला आयुष्यभर रखडवून ठेवेल किंवा यशापासून दूर ठेवेल.

कारण परिस्थिती ही बदलत असते परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नियोजन करून कष्ट देखील करावे लागतात व त्यातून मार्ग काढून यशाचे शिखर गाठावे लागते. याच अनुषंगाने जर आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षांची तयारी करतात. म्हटले जाते की या परीक्षांच्या तयारीसाठी खूप व्यवस्थित पद्धतीचे वातावरण किंवा कोचिंग क्लासेसची आवश्यकता असते.

परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा देत ग्रामीण भागातील अगदी शेतमजूर आणि शेतकऱ्यांची मुलं मुली देखील आता स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत असून क्लासवन पदापर्यंत मजल मारताना दिसून येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कुठल्याही कोचिंग क्लासेसचा आधार न घेता स्वतःच्या मेहनतीवर आणि अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे व अशाच प्रकारे जर आपण पूर्णा तालुक्यातील सुकी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकनाथ काळवंडे यांची यशोगाथा पाहिली तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

 शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पूर्णा तालुक्यातील सुकी येथील रहिवासी असलेले बबनराव काळबांडे हे शेतकरी असून त्यांच्याकडे दोन ते अडीच एकर इतकी शेती आहे. त्यांचे सुपुत्र एकनाथ काळबांडे यांना जिल्हा परिषद तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेमध्ये अनेकदा अपयश आल्यानंतर देखील ते पचवले व न हरता जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. ज्या व्यक्तीला जिल्हा निवड समिती किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षांमध्ये अपयश आले त्या विद्यार्थ्यांनी थेट लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि एवढेच नव्हे तर यामध्ये यशश्री खेचून आणली.

बालपणापासून अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे त्यांची अभ्यासामधील आवड पाहून वडील बबनराव काळबांडे यांनी देखील एकनाथ ला खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. एकनाथ काळबांडे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर धनगर टाकळी या गावात प्राथमिक शाळेत त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर परभणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अधीक्षक ज्ञानेश्वर शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच घरी राहून त्यांनी मराठवाडा हायस्कूल मध्ये नववी व दहावी पूर्ण केली व एका खाजगी होस्टेलमध्ये राहून त्यांनी अकरावी व बारावी पूर्ण केली.

त्यांनी बारावी उत्तीर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आर्ट मधूनच डिग्री घेण्याचे ठरवले व त्याकरिता परभणी येथील संत तुकाराम महाविद्यालय मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले. या ठिकाणी तेथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदवीचा अभ्यास सुरू केला व त्यासोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील सुरू केला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे घरच्यांना आर्थिक आधार व्हावा म्हणून त्यांनी एलआयसी विभागातील परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नामध्ये ते उत्तीर्ण झाले.

दरम्यानच्या कालावधीमध्ये भारतीय जीवन बीमा निगम मध्ये सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात आली व त्यामध्ये देखील त्यांनी यश मिळवले. अशा पद्धतीने घरची आर्थिक परिस्थितीला आधार देण्यासाठी त्यांच्याकडे चांगल्या पदाची नोकरी होती.

परंतु त्यांना उपजिल्हाधिकारी व्हायचे होते व ते स्वप्न त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी परत कष्ट करायला सुरुवात केली व नियोजन करून अभ्यासाला सुरुवात केली. नोकरी करत असताना अभ्यास हा खूप अवघड मार्ग त्यांनी स्वीकारला व खूप कष्ट करून अभ्यास करून उपजिल्हाधिकारी पद मिळवले.

अशा पद्धतीने तुमच्यात जर स्वप्न पाहायची ताकद असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि उर्मी असणे देखील असणे गरजेचे असते व त्यानुसार तुम्ही नियोजन करून प्रयत्न केले व अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळतेच हे एकनाथ काळबांडे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.