चप्पल घालून टू-व्हीलर चालवल्यास ट्रॅफिक पोलीस दंड आकारतात का? पहा काय सांगतोय वाहतुकीचा नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Traffic Rule India : दुचाकी अर्थातच टू व्हीलर चालवणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. वास्तविक, देशात टू व्हीलर चालवणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे.

कमी अंतरावरील प्रवासासाठी तसेच दैनंदिन प्रवासासाठी प्रवासी अधिक तर टू व्हीलर चा वापर करतात. टू व्हीलर ने प्रवास लवकर होतो. टू व्हीलरने गर्दी मध्ये देखील लवकर प्रवास करता येणे शक्य होते.

म्हणून शहरात राहणारे बहुतांशी लोक टूव्हीलरनेच प्रवास करतात. दरम्यान टू व्हीलर चालवताना काही वाहतुकीच्या नियमांचे देखील पालन करावे लागते. यामध्ये गाडी चालवण्यासंदर्भात काही नियम असतात तर काही नियम हे कागदपत्रासंदर्भात आहेत.

हे पण वाचा :- धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…

जर टू व्हीलर चालवताना प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केले तर ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून चालकाकडून मोठी रक्कम वसूल केली जाते. दरम्यान अनेक टु-व्हीलर चालकांना ट्रॅफिक रूल संदर्भात माहिती नसते. म्हणून आज आपण दुचाकीबाबत असलेल्या वाहतुकीच्या एका नियमासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

खरं पाहता, अनेक दुचाकीस्वारांना चप्पल घालून टू व्हीलर चालवली तर पोलीस दंड आकारू शकतात का? नाही? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे आज आपण याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती; आजच इथं करा अर्ज

मोटार वाहन कायद्यानुसार, चप्पल किंवा सॅंडल घालून दुचाकी चालवणे हा गुन्हा आहे. चप्पल किंवा सॅंडलमुळे ग्रीप कमकुवत होते आणि पाय घसरतात. तसेच, दुचाकीचे गीअर्स टाकताना, अशा प्रकारच्या पादत्राणांमुळे पाय घसरून अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते.

म्हणून भारतात मोटार वाहन कायद्यानुसार चालकाने वाहन चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे बंधनकारक आहे. यामुळे चप्पल घालून दुचाकी किंवा स्कूटर चालवणे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

यासोबतच जर शॉर्ट घालून दुचाकी किंवा स्कूटर चालवली तरी देखील दंड भरावा लागतो. शॉर्ट घालून दुचाकी चालवली तर जवळपास दोन हजाराचा दंड ट्रॅफिक पोलीस आकारू शकतात असा नियम आहे. यामुळे दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज आणि शर्ट किंवा टी-शर्ट आणि पूर्ण पॅन्ट घालणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा :- गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्टॉकने 74 हजाराचे बनवलेत 1 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक?