शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! तुरीचे दर 11 हजार 111 रुपये प्रतिक्विंटलच्या विक्रमी भावपातळीवर पोहचले, पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate : या हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन नगदी पिकांनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील बहुतांशी शेतकरी सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. कापूस पिकाची खानदेशात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

पण या हंगामात सोयाबीन आणि कापूस खूपच कमी दरात विकला गेला आहे. यामुळे अनेकांना तर उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. अशातच या हंगामात तुर उत्पादक शेतकऱ्यांना अगदी सुरुवातीपासूनच चांगला भाव मिळत आहे. तुरीने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत.

काल तर तुरीला 11 हजार 111 रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. काल वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या तुरीच्या लिलावात 11 हजार 111 प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजारभाव मिळाला आहे, काल या एपीएमसी मध्ये तुरीची 500 क्विंटल एवढी आवक झाली.

निश्चितच सोयाबीन आणि कापसाला जरी अपेक्षित भाव मिळाला नसला तरी देखील तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. मात्र अशातच केंद्र शासनाने तुरीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हे पण वाचा :- ये रे ये रे पावसा….! मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

केंद्राने घेतला हा निर्णय

तुरीच्या दरात वाढ झाली असल्याने तूर डाळीचे दर गेल्या तीन दिवसात 30 ते 35 रुपयांपर्यंत वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडत आहे. अशातच सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने तुरीच्या साठ्यावर निर्बंध लावले आहेत.

यानुसार आता मोठ्या व्यापाऱ्यांना अधिकाधिक 200 टन आणि छोट्या व्यापाऱ्यांना अधिकाधिक पाच टन तुरीचा साठा ठेवता येणार आहे. यामुळे जरी तुरीच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी देखील अद्याप तुरीच्या दरात घसरण झालेली नसल्याचे बाजारातील चित्र आहे.

सोबतच केंद्र शासनाने तूर आयात करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. मात्र याची अंमलबजावणी होण्यास आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तूर आयातीला विलंब होणार असल्याने तुरीचे दर पुढील काही दिवस तेजीतच राहतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर?

काल वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9850 ते 11 हजार 111 रुपये प्रतिक्विंटल इतका बाजार भाव मिळाला आहे. तसेच मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9500 ते दहा हजार 455 प्रतिक्विंटल इतका बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मात्र या विक्रमी दराचा फायदा खूपच कमी आणि मोजक्याच शेतकऱ्यांना होणार असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते तूर उत्पादकांनी 8000 रुपये प्रति क्विंटल भाव पोहोचताच मालाची विक्री करून टाकली आहे. यामुळे सध्या ज्या थोड्याफार शेतकऱ्यांकडे तुरीचा साठा शिल्लक आहे त्यांनाच याचा फायदा होणार आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राजू शेट्टीची मोठी घोषणा; स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार ‘हे’ काम, शेतकरी पुत्रांच्या शिक्षणाला लागणार मोठा हातभार