सुळेवाडीचा वैभव झाला पोलीस उपनिरीक्षक! शेतात घाम गाळला व घरीच अभ्यास करून मिळवले यश, वाचा कसा केला अभ्यास?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यांसमोर येतो तो प्रचंड प्रमाणात लागणारा अभ्यास आणि महागडे असे कोचिंग क्लासेस वगैरे इत्यादी बाबी डोळ्यासमोर येतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणे हे शहरी भागातील विद्यार्थ्यांचे काम आहे.

ग्रामीण भागातील त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबातील किंवा मजूर कुटुंबातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार न केलेला बरा अशी साधारणपणे कित्येक वर्षापासून समज होती. परंतु ही समज ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी मोडीत काढत  शहरी भागाच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रमाणात उत्तीर्ण होण्याचा टक्का या स्पर्धा परीक्षांमध्ये वाढवल्याचे सध्या दिसून येत आहे.

मागील बऱ्याच निकालांचा जर विचार केला तर यामध्ये शेतात घाम गाळून आणि कष्ट करून किंवा काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून देखील स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळाल्याचे आपण वाचले असेल. या सगळ्या वरून आपल्याला दिसून येते की कुठलेही ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जर प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती असेल आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करण्याची धम्मक जर तुमच्यात असेल तर यश हमखास मिळते.

याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या सुळेवाडी या छोट्या गावातुन आलेल्या वैभव गुंजाळ यांची यशोगाथा पाहिली तर कुठल्याही क्लास किंवा कुठल्याही प्रकारच्या अभ्यासासाठी शहरात न जाता घरी शेती करून आणि शेतामध्ये घाम गाळून अभ्यास केला व पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले. नेमका वैभवचा हा प्रवास कसा होता? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 सुळेवाडीचा वैभव गुंजाळ बनले पोलीस उपनिरीक्षक

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, सुळेवाडी या छोट्याशा गावातील स्व. बाळासाहेब किसन गुंजाळ यांचे थोरले सुपुत्र वैभव यांनी त्यांच्या कष्टाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेली आहे. जर आपण वैभव यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर डोंगराळ भागांमध्ये सुळेवाडी या ठिकाणी थोडीफार त्यांच्याकडे शेती आहे.

यामध्ये 2019 मध्ये वैभव यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचे सर्व जबाबदारी ही वैभवच्या आई मनीषा गुंजाळ यांच्यावर आली. परंतु मुलांना शिकवायचं या निर्णयाने त्यांनी कष्ट सुरू केले. वैभवला देखील कुटुंबाची आर्थिक जाण होती व या बिकट आर्थिक परिस्थिती मधून लवकरात लवकर बाहेर निघण्यासाठी नोकरी करणे गरजेचे होते व त्या दृष्टिकोनातून इंजीनियरिंग करायचे ठरवले.

इंजीनियरिंग पूर्ण करण्यासाठी त्याने संगमनेर येथील महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले व तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. परंतु बऱ्याच व्यक्तींना जे लहानपणापासून स्वप्न असते ते पूर्ण करण्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी याच पद्धतीने लहान किंवा शालेय जीवनापासून वैभवला खाकी वर्दीचे एक विशेष आकर्षण होते. त्यामुळे पोलीस खात्यात भरती होण्याचे जे काही ध्येय होते ते वैभव ला स्वस्थ बसू देत नव्हते.

मेकॅनिकल इंजिनियर होऊन देखील वैभवने त्यामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात केली. वैभव त्यामुळे घरी राहून शेती सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. वैभव चा लहान भाऊ भूषण याला देखील वैभवची आई मनीषा यांनी पुण्यामध्ये यूपीएससीची तयारी करण्यासाठी पाठवले.

तसेच वैभव यांची बहीण उषा यादेखील इंजिनिअर असून त्या पुण्यात नोकरी करतात. विशेष म्हणजे आईने मोलमजुरी करून तीनही मुलांना उच्चशिक्षित केले हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या तिघही भावंडांनी आपापल्या इच्छेने आणि मनाप्रमाणे करिअर निवडले व यशस्वी झाले.

 इंजिनीयर असून दिली एमपीएससी

मेकॅनिकल इंजिनिअर असताना देखील स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात केली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जगात कोरोनाने थैमान घातले. या दरम्यान देखील वैभवचा अभ्यास सुरू होता. परंतु कोरोना कालावधीत कुठल्याही प्रकारच्या परीक्षा झाल्या नाहीत व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु कोरोना मधून बाहेर निघाल्यानंतर सर्व प्रकारच्या परीक्षा होऊ लागल्या व तोपर्यंत वैभवने अभ्यासामध्ये खंड न पडू देता अभ्यास सुरूच ठेवला होता.

कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता मित्रांना सोबत घेऊन संपूर्ण अभ्यास केला होता. वैभवने सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. तसेच मुलाखतीची तयारी देखील खूप उत्तम पद्धतीने केली असल्याने लगेचच पीएसआय पदावर  त्याची निवड झाली.