Wheat Farming : याला म्हणतात जिद्द ! प्रतिकूल परिस्थितीतही योग्य नियोजनाने 35 गुंठ्यात घेतले 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : महाराष्ट्राचे शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतात. नाविन्यपूर्ण असे बदल घडवून आणून शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया राज्यातील अनेक को शेतकऱ्यांनी साधली आहे. असाच काहीसा प्रयोग खेड तालुक्यातील चास येथील एका गहू उत्पादक शेतकऱ्याने केला आहे.

खरं पाहता, रब्बी हंगामात गहू लागवड आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. चास येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष तुकाराम रासकर यांचा देखील गहू पिकावरच मदार आहे. या रब्बीत देखील त्यांनी ची पेरणी केली असून त्यांना 35 गुंठ्यात वीस क्विंटल गहू उत्पादन मिळण्याची आशा आहे.

योग्य नियोजन आणि आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी गव्हाचे पीक अतिशय जोमदार वाढवले आहे. खरं पाहता रासकर यांनी गेल्या काही वर्षात शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे प्रयोग राबवले आहेत. वेगवेगळ्या पिकांच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. गव्हाच्या पिकातून देखील त्यांनी याआधी चांगले उत्पादन घेऊन दाखवले आहे. दरम्यान यावर्षी विपरीत परिस्थितीतही गव्हाचे पीक जोमदार वाढले असून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळणार आहे. 

प्रयोगशील शेतकरी रासकर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी नोव्हेंबर २०२२ च्या सुरवातीस गव्हाची पेरणी केली आहे. आपल्या ३५ गुंठे शेत जमिनीवर त्यांनी वेळेवर बागायती गव्हाची पेरणी केली. पेरणीसाठी वर्धमान कृषी सेवा केंद्र, चासमधून गव्हाचे बियाणे त्यांनी घेतले होते. गव्हाची पेरणी झाल्यानंतर तज्ञांच्या सल्ल्याने खतांची मात्रा पिकाला देण्यात आली.

पाणी व्यवस्थापन देखील पीक वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून यासाठी तज्ञांच मार्गदर्शन त्यांनी घेतलं. कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होऊ नये यासाठी दक्षता घेतली. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास औषधांची फवारणी केली. फवारणी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि शिफारशीत प्रमाणातच करण्याचे त्यांनी नियोजन आखले होते.

खरं पाहता यावर्षी सुरुवातीला थंडीचा जोर महाराष्ट्रात कमीच होता अशा परिस्थितीत गव्हाच्या उगवणीनंतर थंडीचे प्रमाण कमी असल्याने पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची दाट शक्यता होती. यामुळे त्यांनी यासाठी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून गव्हाच्या पिकाचे संवर्धन केले आहे. खरं पाहता गहू पिकासाठी थंडी अतिआवश्यक असते. अधिक तापमानात गहू पीकावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असते.

अशा परिस्थितीत त्यांनी गहू पीक वाढीसाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेऊन, योग्य खताची मात्रा, योग्य पाणी व्यवस्थापन, कीटक आणि रोग नियंत्रणासाठी संतुलित प्रमाणात फवारणी करून गव्हाचे पीक वाढवले असून मात्र दोन महिन्याचे गहू पीक चांगले जोरदार बनले आहे. गव्हाची एक एक ओंबी सात ते आठ इंच लांबीची बनली आहे.

पिकाची वाढही चांगली आहे. अशा परिस्थितीत जर पुढील काही दिवस वातावरण चांगले राहिले अनपेक्षित अशी तापमान वाढ झाली नाही तर या क्षेत्रातून वीस क्विंटल उत्पादन मिळण्याची आशा रासकर यांना आहे. म्हणजेच एक एकर पेक्षा कमी जमिनीत विक्रमी असे उत्पादन मिळणार आहे. रासकर यांचे शेती मधले हे नियोजन निश्चितच त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले आहे.