Scheme For Women: महिला घरबसल्या कमवू शकतात लाखो रुपये! मोदी सरकारच्या ‘या’ योजना महिलांसाठी आहेत फायदेशीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scheme For Women :- मुलींपासून तर समाजातील आर्थिक दुर्बल घटक व महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत करून त्यांना

उदरनिर्वाह करिता तसेच सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या योजनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. यासंदर्भात जर आपण आजकालच्या महिला पाहिल्या तर कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला मागे नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून महिला काम करताना आपल्याला दिसून येतात.

अशाप्रकारे विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचा आहे. परंतु अशा अनेक महिला आहेत की त्यांना काही व्यवसाय करायचा असतो. परंतु गुंतवणुकीसाठी महिलांकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात व्यवसाय करण्याची इच्छा असून देखील त्यांना ते शक्य होत नाही.

त्यामुळे ही समस्या ओळखून केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या महिलांना असे काही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी काही महत्वाच्या योजना केंद्र सरकारने सुरू केले असून या योजनांच्या माध्यमातून महिला लाभ घेऊन घरबसल्या लाखो रुपये कमवू शकतात. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या चार योजना अशा आहेत की ज्या महिलांसाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात.

केंद्र सरकारच्या महिलांसाठी असलेल्या महत्त्वाच्या योजना

1- स्टँड अप इंडिया योजना- ही योजना महिलांसाठी खूपच महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये या योजनेची सुरुवात केलेली होती. स्टँड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिलांना एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याकरिता तब्बल दहा लाख रुपयापासून ते एक कोटी रुपयांपर्यंतची कर्ज सुविधा दिली जाते. महिलांना जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर संबंधित महिलेचा कोणत्याही औद्योगिक कंपनीमध्ये 51% हिस्सा असणे गरजेचे आहे.

2- पंतप्रधान मुद्रा योजना- महिलांना व्यवसाय सुरू करता यावा आणि महिला व्यवसायिकांची संख्या वाढावी याकरिता आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मुद्रा योजना महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी कर्ज सुविधा मिळते. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना कुठल्याही तारणाशिवाय दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. कमीत कमी व्याजदरात हे कर्ज महिलांना उपलब्ध होते. महत्वाचे म्हणजे महिला हे कर्ज घेतल्यावर ते तीन ते पाच वर्षाच्या कालावधीत परतफेड करू शकतात.

3- महिला कॉयर विकास योजना- महिलांमध्ये असलेल्या सुप्त कौशल्याला चालना देण्यासाठी तसेच कौशल्य विकासाला प्राधान्य मिळावे दृष्टिकोनातून या योजनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. यामध्ये नारळ उद्योगाशी संबंधित असलेल्या महिलांना दोन महिन्याचे ट्रेनिंग दिले जाते व या काळात त्यांना मासिक भत्ता देखील मिळतो. तसेच महिलांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवाव्यात याकरिता 75 टक्के कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. यामध्ये महिला ज्या वस्तू बनवतील त्या वस्तू खरेदी करण्याचे देखील सरकारने बंधनकारक केले आहे.

4- महिला समृद्धी योजना- महिला समृद्धी योजना महिलांसाठी खूप महत्त्वाचे असून महिलांना जर एखादा छोटा किंवा मोठा उद्योग सुरू करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे या कर्जाचे जे काही व्याज असते त्यावर सरकारकडून सूट दिली जाते. या योजनेचा लाभ मागासवर्गीय महिला किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा महिलांना मिळू शकतो. अशाप्रकारे महिला या योजनांचा फायदा घेऊन एखादा व्यवसाय सुरू करून घरबसल्या लाखो रुपये मिळवू शकतात.