IPL 2023 विजेता संघ होणार मालामाल , जाणून घ्या कोणत्या संघाला किती मिळणार पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPL 2023 Prize Money : काल दि. 21 मे रोजी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणारी IPL च्या 16 व्या हंगामाचे लीग सामने संपले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता IPL 2023 विजेतेपदासाठी GT, CSK, MI आणि LSG या संघामध्ये भिडत होणार आहे.

तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय IPL 2023 विजेता संघाला मालामाल करणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला देखील बीसीसीआय मालामाल करणार आहे. या संघाला देखील 13 कोटी रुपयेही दिले जाणार आहेत.

तर प्लेऑफमध्ये येणाऱ्या उर्वरित संघाना 7-7 कोटी रुपये बीसीसीआयकडून दिले जाणार आहे. आणि  बीसीसीआय ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, मॉस्ट वैलुएबल प्लेयर , सुपर स्ट्रायकर आणि सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंना देखील मोठी रक्कम देणार आहे.

ऑरेंज कॅप – रु 15 लाख

पर्पल कॅप – रु 15 लाख

मॉस्ट वैलुएबल प्लेयर – 12 लाख रुपये

सुपर स्ट्रायकर – रु. 15 लाख

सर्वाधिक षटकार – 12 लाख रु

प्लेऑफ सामने कधी होतील

आयपीएल 2023 चा पहिला प्लेऑफ सामना 23 मे पासून सुरू होईल आणि या दिवशी पहिला क्वालिफायर सामना खेळला जाईल. यानंतर 24 मे रोजी एलिमिनेटर सामना आणि त्यानंतर दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या CSK यांच्यात लढत होईल. दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेला लखनौ आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई यांच्यात सामना होणार आहे.

प्लेऑफ सामने कधी आणि कुठे होणार?

23 मे – पहिला क्वालिफायर – गुजरात विरुद्ध चेन्नई (चेन्नई), संध्याकाळी 7.30 वा

24 मे – एलिमिनेटर सामना – लखनौ विरुद्ध मुंबई (चेन्नई), संध्याकाळी 7.30 वा.

26 मे – दुसरा क्वालिफायर – (अहमदाबाद), संध्याकाळी 7.30 वा

28 मे – अंतिम सामना – (अहमदाबाद), संध्याकाळी 7.30 वा